Big News- क्रिकेटर मिताली राजने प्रशिक्षक रमेश पोवारवर केले गंभीर आरोप

उपांत्य सामन्याच्या एकदिवसआधी ती पूर्ण फिट असल्याचे सांगण्यात आले होते. असे असूनही मॅनेजमेंटने तिला संघाबाहेर ठेवत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना जिंकणाऱ्या संपूर्ण संघालाच पुन्हा एकदा प्राधान्य दिले.

News18 Lokmat | Updated On: Nov 27, 2018 05:39 PM IST

Big News- क्रिकेटर मिताली राजने प्रशिक्षक रमेश पोवारवर केले गंभीर आरोप

नवी दिल्ली, २७ नोव्हेंबर २०१८- भारताची महिला क्रिकेटची माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू मिताली राजने टीमचे प्रशिक्षक रमेश पोवारवर अपमानित केल्याचा आरोप केला आहे. तसेच बीसीसीआयच्या प्रशासक समितीची सदस्य डायना इदुल्जीवर भेदभाव केल्याचाही आरोप केला आहे. मिताली राजने बीसीसीआयला पत्र लिहित म्हटले की, माझा हरमनप्रीत कौरसोबत कोणताही वाद नाही. मात्र मी प्रशिक्षक रमेश पोवारच्या निर्णयासोबत नाही. रमेश पोवारने मला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात संघात न घेण्याचा निर्णय घेतला आणि हरमनप्रीतने त्या निर्णयाला दुजोरा दिला. मला देशासाठी वर्ल्डकप जिंकायचे होते. आम्ही चांगली संधी गमावली याचं मला दुःख आहे.


मितालीने पोवारविरुद्ध लिहिले की, ‘जर मी त्यांच्या आजूबाजूला बसलेले असेन तर ते तिथून उठून निघून जायचे. तसंच सरावावेळी दुसऱ्यांची फलंदाजी ते आवर्जुन पाहायचे. मात्र माझ्यावेळी ते मैदानात थांबायचे नाहीत. मी त्यांच्याशी बोलायला जायचे तर ते फोनमध्येच पाहायचे किंवा तिथून निघून जायचे. ही फार अपमानास्पद होतं. हे सगळ्यांनाच दिसतं होतं की मला पार अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. एवढं सगळं होऊनही मी माझं लक्ष विचलित होऊ दिलं नाही. २० वर्षांच्या माझ्या करिअरमध्ये मला पहिल्यांदा अपमानास्पद वाटलं. देशासाठी दिलेलं योगदान सत्तेवर असणाऱ्या लोकांना दिसतं की नाही, की फक्त त्यांना माझा आत्मविश्वास कमी करायचा आहे. हा विचारही माझ्या मनात आला.’


मिताली राजने सीओए सदस्य डियाना इडुलजीवर भेदभाव केल्याचे आरोप केले. तिने पत्रात लिहिले की, ‘मला माहितीये की हे पत्र लिहून मी मोठी जोखीम उचलत आहे. त्या (डियाना इडुलजी) सीओएच्या सदस्य आहेत आणि मी फक्त एक खेळाडू. मी उपांत्य फेरीच्यापूर्वी सलग दोन सामन्यात अर्धशतकी खेळी खेळली आणि मला प्लेअर ऑफ दी मॅचचा पुरस्कारही मिळाला. पण तरीही मला उपांत्य फेरीच्या सामन्यात संघाबाहेर ठेवण्यात आले.’

Loading...


दरम्यान, प्रशासकीय समितीच्या (CoA) सदस्य आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार डियाना इदुलजींया मते, सीओए मिताली राजच्या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप करणार नाही. डियाना या सीओएच्या दोन सदस्य समितीच्या सदस्य आहेत. त्यांच्या मते, समिती कोणत्याही क्रिकेटच्या निर्णयांचं ओझं घेऊ शकत नाही.

महिला वर्ल्डकप टी२० मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात मितालीला बाहेर बसवण्यात आले होते. हा सामना भारत हरला होता. त्यामुळे वर्ल्डकपमधूनही भारताला बाहेर पडावं लागलं होतं. अनुभवी खेळाडूला महत्त्वपूर्ण सामन्यात बाहेर बसवणं योग्य आहे का या प्रश्नावरून वाद सुरू झाला होता. आता या वादाने रौद्र रूप घेतलं आहे.


मिताली राजला वगळल्यावर सौरव गांगुलीला आठवला आपला दुर्दैवी भूतकाळ
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात गुडघ्याच्या दुखापतीमुळे मिताली बाहेर बसली होती. मात्र त्याआधी खेळण्यात आलेल्या दोन्ही सामन्यात मितालीने अर्धशतकी खेळी खेळली होती. उपांत्य सामन्याच्या एकदिवसआधी ती पूर्ण फिट असल्याचे सांगण्यात आले होते. असे असूनही मॅनेजमेंटने तिला संघाबाहेर ठेवत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना जिंकणाऱ्या संपूर्ण संघालाच पुन्हा एकदा प्राधान्य दिले.

यावर इदुलजी म्हणाल्या की, ‘सीओए या प्रकरणात स्वतःहून पडणार नाही. आम्ही क्रिकेटच्या मुद्यांमध्ये कोणत्याही प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही. प्लेईंग ११ मध्ये कोणी खेळावं हा आमचा निर्णय नाही आणि हा निर्णय दुसऱ्या कोणाचाही नाही. मॅनेजमेंटने याचा निर्णय घ्यावा. मॅनेजमेंटच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करण्याचं काम सीओएचं नाही.’


Videos : समोर आला एम.एस. धोनीचा रिटायरमेन्ट प्लॅन, करणार हे विशेष काम


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2018 04:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...