मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : टीम इंडिया ऑस्ट्रेलियात त्रस्त, क्वारंटाईन सेंटरमध्ये खेळाडूंचे हाल!

IND vs AUS : टीम इंडिया ऑस्ट्रेलियात त्रस्त, क्वारंटाईन सेंटरमध्ये खेळाडूंचे हाल!

भारतीय महिला क्रिकेट टीम (Indian Women Cricket Team) वन-डे, टी20 आणि टेस्ट सीरिज खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे. यावेळी त्यांना 14 दिवस ब्रिस्बेनमधील सरकारी क्वारंटाईन सेंटरमध्ये राहवं लागणार आहे.

  • Published by:  News18 Desk

ब्रिस्बेन, 3 सप्टेंबर: भारतीय महिला क्रिकेट टीम (Indian Women Cricket Team) वन-डे, टी20 आणि टेस्ट सीरिज खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे. यावेळी त्यांना 14 दिवस ब्रिस्बेनमधील सरकारी क्वारंटाईन सेंटरमध्ये राहवं लागणार आहे. यापैकी सध्या फक्त 4 दिवस झाले आहेत. पण या 4 दिवसात खेळाडू त्रस्त झाले आहेत. भारतीय खेळाडूंना जिथं क्वारंटाईन करण्यात आलंय, तेथील रुम अगदीच लहान आहेत. त्यामुळे खेळाडूंना नीट सरावही करता येत नाही.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, 'ब्रिस्बेनमधील क्वारंटाईन सेंटरच्या रुम खूप लहान आहेत. या खोलीमध्ये जास्त ट्रेनिंग करता येत नाही. येथील नियम देखील चांगलेच कडक आहेत. पण त्यामधील एक दिलासादायक बाब म्हणजे ब्रिटनप्रमाणे इथं क्वारंटाईन सेंटरच्या बाहेर सुरक्षा रक्षक उभे नाहीत.

इथं दिलं जाणारं जेवण ठीक आहे. रोज मेन्यूमध्ये बदल होत आहे. पण इतक्या लहान रूममध्ये दोन आठवडे राहणे अतिशय आव्हानात्मक आहे.'

भारत-ऑस्ट्रेलिया सीरिजला कोरोनाचा फटका

भारतीय महिलांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा कार्यक्रम कोरोनामुळे बदलण्यात आला आहे. न्यू साऊथ वेल्स (New South Wales) आणि व्हिक्टोरिया  (Victoria) राज्यात कोरोना पेशंट्सची संख्या वाढल्यानं लॉकडाऊन कठोर करण्यात आला आहे. यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेचं वेळापत्रक बदलण्यात आलं आहे. आता या सीरिजमधील सर्व सामने क्वीन्सलँडमध्ये (Queensland) होतील. यापूर्वी या सीरिजमधील पहिला सामना 19 डिसेंबरला होणार होता. तो आता 21 डिसेंबरला होईल. त्याचबरोबर सर्व सामन्यांच्या जागेतही बदल करण्यात आला आहे.

Tokyo Paralympics : पॅरालिम्पिकमध्ये अवनीची कमाल, गोल्डनंतर जिंकलं आणखी एक मेडल

भारतीय महिला टीमच्या दौऱ्याची सुरुवात वन-डे सीरिजनं होणार होती. पहिला सामना सिडनी दुसरा मेलबर्न आणि तिसरा पर्थमध्ये होणार होता. पण आता तीन्ही सामने क्वीन्सलँड राज्यातील मकायमध्ये होतील. येथील ग्रेट बॅरियर रिफ एरिना (Great Barrier Reef Arena) स्टेडियमध्ये हे सामने होतील. दोन्ही टीममधील पिंक बॉल टेस्ट 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. ही टेस्ट आता पर्थच्या जागी गोल्ड कोस्टवरील मेट्रीकॉन स्टेडियमवर (Metricon Stadium) खेळली जाईल.  याच मैदानावर 7, 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी टी 20 सामन्यांची मालिका खेळली जाईल.

First published:

Tags: Australia, Cricket news