• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WBBL: टीम इंडियाच्या कॅप्टनची ऐतिहासिक कामगिरी, ऑस्ट्रेलियात केला नवा विक्रम

WBBL: टीम इंडियाच्या कॅप्टनची ऐतिहासिक कामगिरी, ऑस्ट्रेलियात केला नवा विक्रम

टीम इंडियाच्या पुरूष खेळाडूंना अन्य देशातील टी20 लीगमध्ये खेळण्यास परवानगी नाही. मात्र महिला खेळाडूंना परवानगी आहे. याचा फायदा टीम इंडियाच्या महिला टी 20 टीम (Team India Women T20) कॅप्टन हरमनप्रीत कौरला (Harmanpreet Kaur) मिळाला आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 नोव्हेंबर: टीम इंडियाच्या पुरूष खेळाडूंना अन्य देशातील टी20 लीगमध्ये खेळण्यास परवानगी नाही. मात्र महिला खेळाडूंना परवानगी आहे. याचा फायदा टीम इंडियाच्या महिला  टी 20 टीम (Team India Women T20) कॅप्टन हरमनप्रीत कौरला (Harmanpreet Kaur) मिळाला आहे. हरमनप्रीत महिलांच्या बिग बॅश स्पर्धेच्या (WBBL) या सिझनमधील 'प्लेअर ऑफ द टुर्नामेंट' ठरली आहे. हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय आहे. हरमनप्रीतने मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळताना  2021 च्या सिझनमध्ये 66.50 च्या सरासरीनं 399 रन काढले. त्याचबरोबर तिनं 20.40 च्या सरासरीनं 15 विकेट्स देखील घेतल्या. या स्पर्धेत तिनं 135.25 च्या स्ट्राईक रेटनं तीन अर्धशतक देखील झळकावले आहेत. हरमनचा या स्पर्धेतील आजवरचा सर्वोच्च स्कोअर नाबाद 81 आहे. मेलबर्नची टीम प्ले ऑफमध्ये दाखल झाली असून तिची पुढील लढत गुरुवारी होणार आहे. या मॅचमध्ये मेलबर्नचा विजय झाल्यात ती टीम 29 नोव्हेंबरला पर्थ स्कॉचर्स विरूद्ध फायनल खेळेल. हरमनचा या स्पर्धेतील महिला टीममध्येही समावेश करण्यात आला आहे. हरमनची बॅटींग तर सर्वांना माहिती आहे. पण या सिझनमध्ये लेग स्पिनर जॉर्जिया वारेहम जखमी झाल्यानंतर तीनं बॉलिंगमध्येही दमदार कामगिरी केली आहे. या सिझनच्या टीममध्ये निवड झालेली ती एकमेव भारतीय आहे. या स्पर्धेत शतक झळकावणाऱ्या स्मृती मंधानालाही (Smrti Mandhana) या टीममध्ये जागा मिळालेली नाही. पहिल्या टेस्टमध्ये विराटच्या जागेवर खेळणार 'हा' मुंबईकर, अजिंक्य रहाणेनं केलं जाहीर हरमनप्रीत कौर टीम इंडियाच्या टी20 टीमची कॅप्टन आहे. हरमनच्या कॅप्टनसीमध्येच टीम इंडियानं टी20 वर्ल्ड कप खेळला आहे. हरमननं 120 टी20 इंटरनॅशनलमध्ये 26.51 च्या सरासरीनं 2307 रन काढले आहेत. यामध्ये सहा अर्धशतक आणि एक शतकाचा समावेश आहे. 103 हा तिचा सर्वोच्च स्कोअर आहे.
  Published by:News18 Desk
  First published: