INDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक?

वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ रविवारी जाहीर करण्यात आला.

  • Share this:

भारतीय संघ 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. एकदिवसीय, टी20 आणि वनडे मालिकेसाठी रविवारी संघ जाहीर करण्यात आला. तिन्ही प्रकारात भारताचे नेतृत्व विराट कोहलीकडेच राहणार आहे.

धोनीने माघार घेतल्यानं पंतकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर बुमराहला मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधून विश्रांती देण्यात आली आहे. वर्ल्ड कपप्रमाणे विंडीज दौऱ्यावरील काही खेळाडूंच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विंडीजविरुद्ध टी 20 संघात वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली आहे. सध्या सुंदर इंडिया ए संघात खेळत आहे. त्याची निवड झाली असली तरी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याची कामगिरी म्हणावी तितकी प्रभावी नाही तरीही त्याला संघात घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

वर्ल्ड कपमध्ये केदार जाधवच्या कामगिरीवर टीका करण्यात आली होती. त्याला अखेरच्या काही सामन्यात प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं होतं. 5 सामन्यात 80 धावा करणाऱ्या केदार जाधवला एकदिवसीय संघात स्थान दिल्यानं भुवया उंचावल्या आहेत. तो फलंदाजी आणि गोलंदाजीसुद्धा करू शकतो यामुळं त्याला संधी मिळाली आहे. सध्या 34 वर्षाचा असलेल्या केदार जाधव पुढच्या वर्ल्ड कपमध्ये खेळणं कठीण आहे. तरीसुद्धा त्याची वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी निवड झाल्यानं प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वेस्ट इंडीज दौऱ्यात सर्वात धक्कादायक निवड कसोटी संघात रोहित शर्माची असल्याची चर्चा होत आहे. रोहित शर्माची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी जबरदस्त असली तरी 47 डावात आशियाबाहेर फक्त 3 वेळा अर्धशतक करू शकला आहे. रोहित मर्यादित षटकांत जशी कामगिरी करतो तशी कसोटीत करू शकत नाही. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीला खेळणारा रोहित कसोटीत मधल्या फळीत खेळतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Jul 22, 2019 01:36 PM IST

ताज्या बातम्या