मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Breaking News: हरभजन सिंग क्रिकेटमधून निवृत्त, 23 वर्षांच्या कारकिर्दीनंतर भज्जीचा अलविदा

Breaking News: हरभजन सिंग क्रिकेटमधून निवृत्त, 23 वर्षांच्या कारकिर्दीनंतर भज्जीचा अलविदा

टीम इंडियाचा दिग्गज ऑफ स्पिनर हरभजन सिंगनं (Harbhajan Singh) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

टीम इंडियाचा दिग्गज ऑफ स्पिनर हरभजन सिंगनं (Harbhajan Singh) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

टीम इंडियाचा दिग्गज ऑफ स्पिनर हरभजन सिंगनं (Harbhajan Singh) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

मुंबई, 24 डिसेंबर : टीम इंडियाचा दिग्गज ऑफ स्पिनर हरभजन सिंगनं (Harbhajan Singh) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. हरभजननं 1998 साली वयाच्या 17 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आता त्याने तब्बल 23 वर्षांनी क्रिकेटला अलविदा केला आहे.

हरभजननं ट्विट करत निवृत्तीची घोषणा केली आहे. टीम इंडियाच्या महान स्पिनरपैकी एक असलेल्या हरभजननं 103 टेस्टमध्ये 415 विकेट्स घेतल्या आहेत. तर वन-डे क्रिकेटमध्ये 269 आणि टी20 इंटरनॅशनलमध्ये 25 विकेट्सची त्याच्या नावावर नोंंद आहे. भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2001 साली जिंकलेल्या ऐतिहासिक टेस्ट सीरिजमध्ये हरभजनचा वाटा मोठा होता. त्याचबरोबर 2007 टी 20 वर्ल्ड कप आणि 2011 वन-डे वर्ल्ड कप विजेत्या टीमचाही तो सदस्य आहे.

'सर्व चांगल्या गोष्टींचा कधीतरी शेवट होतो. मी आज मला सर्व काही देणाऱ्या खेळाला अलविदा करत आहे. हा 23 वर्षांचा मोठा प्रवास सुंदर आणि संस्मरणीय करण्यात मदत करणाऱ्या सर्वांचे मनापासू आभार.' असे ट्विट हरभजनने केले आहे.

IND vs SA : टीम इंडियातील 3 जागांसाठी विराट-द्रविडला घ्यावे लागणार कठोर निर्णय

हरभजनची आयपीएल कारकिर्द देखील जबदरस्त ठरली आहे. तो मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या आयपीएल विजेत्या टीमचा सदस्य होता. यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये (IPL 2021) तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला होता. हरभजनने आयपीएलमध्ये 150 विकेट्स घेतल्या आहेत. हरभजन एखाद्या आयपीएल टीमचा बॉलिंग कोच होईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे, पण त्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

First published:
top videos

    Tags: Cricket news, Harbhajan singh