• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2022: थोड्याच वेळात नव्या टीम होणार निश्चित! Deepika-Ranveer, अदानी, मँचेस्टरपैकी यापैकी कोण मालक? याचा होणार फैसला

IPL 2022: थोड्याच वेळात नव्या टीम होणार निश्चित! Deepika-Ranveer, अदानी, मँचेस्टरपैकी यापैकी कोण मालक? याचा होणार फैसला

आयपीएल 2022 (IPL 2022) 2 नव्या टीमची आता थोड्याच वेळात घोषणा होणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 25 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) महामुकाबला आता आटोपला आहे. गेले काही दिवस सर्वच भारतीय फॅन्सचं या मॅचकडं लक्ष होतं. या मॅचचा निकाल रविवारी लागला. आता भारतीय क्रिकेट फॅन्सना आणखी एका मोठ्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. आयपीएलच्या 2 नव्या फ्रँचायझी मालकांची आता घोषणा होणार आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया' नं दिलेल्या वृत्तानुसार सोमवारी सकाळी दुबईमध्ये उपस्थित असलेल्या बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर या दोन फ्रँचायझींसाठी लावण्यात आलेल्या सर्व बोली सादर करण्यात येतील. त्यानंतर या बाबतचे नेमण्यात आलेले बीसीसीआयचे अधिकारी नव्या दोन फ्रँचाझींची घोषणा करतील.बीसीसीआयनं काही वेळापूर्वीच याबाबत ट्विट करत हा निर्णय लवकरच होणार असल्याचं जाहीर केलं आहे. आयपीएल लिलावासाठी नव्या टीमचे बेस प्राईस 2 हजार कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे. या टीमच्या खरेदी साठी अनेक मोठ्या बिझनेस ग्रुपनं रस दाखवला आहे. त्याचबरोबर जगातील सर्वात लोकप्रिय फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड देखील  (Manchester United) आयपीएलमध्ये एन्ट्री करण्यासाठी उत्सुक आहे. टीम इंडियाच्या पराभवानं डिप्रेशन आलंय? 'हे' 5 उपाय करतील तुम्हाला नॉर्मल Deepika Padukone-Ranveer Singh रेसमध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल असलेलं दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंह (Deepika Padukone-Ranveer Singh) ही जोडी देखील नवी टीम खरेदी करण्यासाठी इच्छूक असल्याचं वृत्त आहे. रणवीर सिंह  आणि दीपिका पादुकोण हे दोघंही त्यांच्या चित्रपटाबरोबरच स्पोर्ट्स फॅन म्हणून प्रसिद्ध आहेत दीपिकी भारताचे महान बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची मुलगी असून ती देखील नॅशनल बॅडमिंटनपटू आहे. तर रणवीर प्रीमियर लीग पासून NBA पर्यंतच्या ग्लोबल लीगचा भारतीय ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. दीपिका-रणवीर हे दोघंच नव्या टीमसाठी बोली लावणार की त्यांच्यासोबत अन्य भागीदार आहेत. तसंच ते कोणत्या शहराच्या टीमसाठी बोली लावणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आरपीएसजी ग्रुपचे संजीव गोयंका यांचे नाव देखील यासाठी चर्चेत होते. पण हर्ष गोयंका यांनी आपण आयपीएल टीम विकत घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता ऑरोबिंदो फार्मा, अडानी ग्रुप तसंच मँचेस्टर युनायटेड यांच्यात नव्या आयपीएल फ्रँचायझीसाठी स्पर्धा आहे.
  Published by:News18 Desk
  First published: