टीम इंडियाच्या या खेळाडूंना मिळाली नव्हती पितृत्वाची सुट्टी

टीम इंडियाच्या या खेळाडूंना मिळाली नव्हती पितृत्वाची सुट्टी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये टीम इंडिया (Team India) चा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या टेस्टनंतर भारतात परतणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे विराट दौरा अर्धवट सोडणार आहे.

  • Share this:

सिडनी,22 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये टीम इंडिया (Team India) चा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या टेस्टनंतर भारतात परतणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे विराट दौरा अर्धवट सोडणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. 27 नोव्हेंबरपासून वनडे सीरिजने या दौऱ्याची सुरुवात होईल, तर यानंतर टी-20 सीरिज खेळवली जाईल. 17 डिसेंबरला ऍडलेडमध्ये पहिली टेस्ट मॅच सुरु होईल. ही टेस्ट मॅच डे-नाईट असेल.

पहिली टेस्ट मॅच संपल्यानंतर विराट कोहलीच्या पितृत्वाची रजा बीसीसीआय (BCCI) ने मंजूर केली आहे. पण विराट कोहलीच्या आधी टीम इंडियाचा कर्णधार राहिलेल्या एमएस धोनी (MS Dhoni) ने पितृत्वाची रजा घेतली होती. फेब्रुवारी 2015 साली भारतीय टीम वर्ल्ड कप खेळायला ऑस्ट्रेलियाला गेली होती, तेव्हाच धोनीची पत्नी साक्षीने मुलीला जन्म दिला. पण धोनीने मायदेशात न परतता वर्ल्ड कप खेळण्याचा निर्णय घेतला. मुलगी झाल्याचं साक्षीने सुरेश रैनाला सांगितलं आणि मग रैनाने ही आनंदाची बातमी धोनीला दिली.

-1976 साली सुनिल गावसकर यांची पितृत्वाची सुट्टी रद्द करण्यात आली होती. त्यावेळी गावसकर यांचा मुलगा रोहनचा जन्म व्हायचा होता, पण भारतीय टीमला चार टेस्ट मॅच खेळण्यासाठी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जायचं होतं. गावसकर यांनी अडीच महिन्यानंतर आपल्या मुलाला बघितलं होतं.

- राहुल द्रविड 2009 साली आपला दुसरा मुलगा अन्वयच्या मुलाच्या जन्मावेळी आयपीएल सोडून भारतात परतला होता. 2009 सालची आयपीएल दक्षिण आफ्रिकेत खेळवली गेली होती.

- 2018 साली रोहित शर्मालाही बीसीसीआयने पितृत्वाची सुट्टी दिली होती. रोहित शर्मा ऑस्ट्रेलियातली चौथी आणि पाचवी टेस्ट न खेळता भारतात परतला होता.

- गौतम गंभीरही 2014 सालची आयपीएल अर्धवट सोडून युएईमधून भारतात परतला होता. मुलीच्या जन्मानंतर गंभीर पुन्हा कोलकात्याची मॅच खेळण्यासाठी रांचीला रवाना झाला होता.

- विराटच्या पितृत्वाची रजा स्वीकार करणाऱ्या बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने एक महिन्यानंतर मुलीला बघितलं होतं. 2001 साली गांगुली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करत होता.

Published by: Shreyas
First published: November 22, 2020, 9:11 AM IST
Tags:

ताज्या बातम्या