कर्णधारपद धोक्यात? विराटने घेतला हा मोठा निर्णय!

विराट पुढील मालिकेत खेळणार नाही असे वृत्त समोर आले होते. पण...

News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2019 07:25 AM IST

कर्णधारपद धोक्यात? विराटने घेतला हा मोठा निर्णय!

नवी दिल्ली, 16: भारतीय संघाला आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपचे (icc world cup 2019) विजेतेपद मिळवून देण्यास अपयशी ठरल्यानंतर आता विराट कोहलीने (virat kohli) एक मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. वर्ल्ड कपमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव झाला होता. त्यानंतर विराट पुढील मालिकेत खेळणार नाही असे वृत्त समोर आले होते. भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जात आहे. एका महिन्याच्या या मालिकेत भारत वनडे, टी-20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे.

वर्ल्ड कपनंतर वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कर्णधार विराट कोहली आणि जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली जाणार असल्याचे वृत्त होते. पण आता नव्याने हाती आलेल्या माहितीनुसार विराट वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार असल्याचे कळते. यासंदर्भातील वृत्त मुंबई मिररने दिले आहे.

या कारणामुळे विराट जातोय दौऱ्यावर

विराट वेस्ट इंडिज दौऱ्यावर का जाणार आहे यांचे अंदाज बांधले जात आहेत. विराटच्या कर्णधारपदावर संकट आल्यामुळे तो वेस्ट इंडिज दौऱ्यावर जात नाही ना अशी देखील चर्चा आहे. वर्ल्ड कपमधील पराभवानंतर बीसीसीआय भारतीय संघासाठी दोन कर्णधार निवडण्याचा विचार करत आहे. मीडियी रिपोर्टनुसार विराट कोहलीला कसोटी संघाचा तर रोहित शर्माला वनडे संघाचा कर्णधार केले जाऊ शकते. अर्थात या गोष्टीला अद्याप अधिकृत दुजोरा दिला गेला नाही.

असा असेल वेस्ट इंडिज दौरा

Loading...

भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौऱा 3 ऑगस्टपासून सुरु होत आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 3 टी-20 सामने, 3 वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकेने होणार आहे. त्यानंतर 8 ऑगस्टपासून वनडे तर 22 ऑगस्टला पहिला कसोटी सामना सुरू होईल. या दौऱ्यासाठी 19 जुलै रोजी भारतीय संघाची निवड होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी या दौऱ्यावर जाणार नाही. तर शिखर धवन देखील उपलब्ध असणार नाही. त्याच्या जागी मयंक अग्रवालला संघात संधी मिळू शकते.

संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरांतांची कोंडी होणार की विधानसभेपुरता 'बाय' मिळणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 07:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...