Home /News /sport /

इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहलीला धक्का, जवळच्या व्यक्तीचे निधन

इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहलीला धक्का, जवळच्या व्यक्तीचे निधन

इंग्लंड दौऱ्याच्या तयारीमध्ये व्यस्त असलेला टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीसाठी (Virat Kohli) एक वाईट बातमी आहे.

    नवी दिल्ली, 22 मे : इंग्लंड दौऱ्याच्या तयारीमध्ये व्यस्त असलेला टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीसाठी (Virat Kohli) एक वाईट बातमी आहे. कोहलीला लहाणपणी बॅटींग शिकवणारे कोच सुरेश बत्रा (Suresh Batra) यांचे निधन झाले आहे. ते 53 वर्षांचे होते. विराटनं पश्चिम दिल्लीच्या क्रिकेट अकादमीमध्ये राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma) यांच्या अकादमीमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले. बत्रा या अकादमीमध्ये सहाय्यक कोच होते. त्यांनी सर्वप्रथम विराट कोहलीची  गुणवत्ता ओळखली होती. वरिष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकपल्ली यांनी दिलेल्या माहितीनुसार 'सुरेश बत्रा गुरुवारी सकाळी पूजा करताना अचानक खाली पडले. त्यातच त्यांचे निधन झाले.' लोकपल्ली यांनी एक फोटो ट्विट करत बत्रा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. विराट कोहली सुपरस्टार होण्यापूर्वी राजकुमार शर्मा आणि सुरेश बत्रा या दोघांनीच त्याच्यातील गुणवत्तेला पैलू पाडले होते. विराटसह 2018 मधील अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनलमध्ये शतक झळकावणाऱ्या मनजोत कालाराला  देखील बात्रा यांनी प्रशिक्षण दिले होते. एका सिक्समध्ये दिसली होती विराटची गुणवत्ता बत्रा यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांना विराटची प्रतिभा सर्वप्रथम कधी जाणवली त्याचा किस्सा सांगितला आहे. 'अंडर-14 मॅचमध्ये विराटनं एक जबरदस्त शतक झळकावले होते. त्या मॅचमध्ये विराटनं एक बॉल अतिशय सहजपणे ओळखला आणि मिड-विकेटच्या दिशेला सिक्स लगावला. 10 वर्षाच्या मुलासाठी तो एक जबरदस्त शॉट होता.' याच सिक्समुळे विराटमधील गुणवत्ता पहिल्यांदा जाणवली अशी आठवण बत्रा यांनी सांगितली होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Virat kohli

    पुढील बातम्या