चहलने सरकारी नोकरीसाठी फिल्डिंग करताना घातला होता चष्मा!

चहलने सरकारी नोकरीसाठी फिल्डिंग करताना घातला होता चष्मा!

भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलची वेस्ट इंडीज दौऱ्यावर फक्त एकदिवसीय संघात निवड झाली असून टी20 साठी मात्र त्याला संधी मिळाली नाही.

  • Share this:

मुंबई, 23 जुलै : भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याला बीसीसीआयने चहलचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. युझवेंद्र चहलच्या चहल टीव्हीच्या नावे मजेशीर व्हिडिओ बीसीसीआय शेअर करत असते. संघातील सहकाऱ्यांची फिरकी घेत त्यांच्याशी संवाद साधत असलेले हे व्हिडिओ असतात.

हरियाणातील जींदमधून आलेल्या चहलने आतापर्यंत भारताकूडन 49 एकदिवसीय आणि 31 टी20 सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे 84 आणि 46 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमधअये तो रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुकडून खेळतो. चहलला आतापर्यंत एकदाही कसोटी संघात मात्र स्थान मिळवता आलेलं नाही. तसेच विंडीज दौऱ्यावर त्याला टी 20 संघातून वगळण्यात आलं आहे.

चहलने ब्रेकफास्ट विथ चॅम्पियनमध्ये बोलताना सांगितलं होतं की, क्रिकेटसोबत तो सरकारी नोकरीसुद्धा करतो. चहल इन्कम टॅक्स विभागात निरीक्षक पदावर कार्यरत आहे. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्याची निवड झाली होती.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर चहल चष्मा घालून मैदानात उतरला होता. इन्कम टॅक्स विभागात निरीक्षकाच्या नोकरीसाठी त्याची वैद्यकीय चाचणी होणार होती. त्यासाठी त्याला चष्मा घालण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळेच तो क्षेत्ररक्षणावेळीसुद्धा चष्मा घालायचा.

फाफ डुप्लेसीला गोलंदाजी कशी करतोस याबद्दल बोलताना त्यानं आपल्याला बुद्धीबळ आवडत असल्याचं सांगितलं होतं. त्यातूनच रणनिती कशी आखायची हे शिकलो. बुद्धीबळ खेळताना तुम्हाला 15-16 चाली पुढचा विचार करावा लागतो. तसंच डुप्लेसीला गोलंदाजी करताना त्याला कोणता चेंडू टाकायचा याची योजना आधीच तयार करावी लागते असं चहलने सांगितलं होतं.

World Cup मध्ये शमी-जडेजा यांच्यामुळे रोहित-विराटचं बिनसलं?

VIDEO : प्रसिद्ध अमेरिकी टेनिसपटूच्या लग्नात बॉलिवूडच्या 'या' गाण्यानं धम्माल

VIDEO: तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; अग्निशमन दलाने वाचवले प्राण

Published by: Suraj Yadav
First published: July 23, 2019, 11:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading