युवराज सिंग निवृत्ती घेणार? बीसीसीआयकडे केली ही मागणी

युवराज सिंग निवृत्ती घेणार? बीसीसीआयकडे केली ही मागणी

2011 मध्ये भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणारा युवराज सिंग निवृत्ती घेण्याच्या विचारात.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 मे : भारताला 2011 चा वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाची कामगिरी पार पाडणारा युवराज सिंग निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे. बऱ्याच काळापासून युवराज सिंग संघातून बाहेर आहे. त्याला यंदाच्या वर्ल्ड कपच्या संघातही स्थान मिळाले नाही. आयपीएलमध्येही मुंबई इंडियन्सकडून त्याला जास्त संधी दिली नाही. यामुळेच त्याने भविष्याच्या दृष्टीने विचार करण्यास सुरुवात केली आहे.

युवराज सिंग परदेशी टी 20 लीगमध्ये खेळण्याची शक्यता आहे. यासाठी बीसीसीआयची परवानगी मिळाल्यानंतर युवराज निर्णय घेईल. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार युवराज आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि प्रथम श्रेणीतून निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे. त्यासाठी बीसीसीआयसोबत बोलून जीटी20 (कॅनडा), आय़र्लंडमध्ये युरो टी20 स्लॅम आणि हॉलंडमध्ये खेळण्यासाठी परवानगी मागितली आहे.

अरफान पठाणने नुकतंच कॅरेबियन प्रीमियर लीगसाठी नाव दिलं होतं. मात्र, तो अजूनही प्रथम श्रेणीत खेळत असल्याने बीसीसीआयकडून त्याला परवानगी मिळाली नाही. त्यामुळे युवराजलासुद्धा जर परदेशी लीगमध्ये खेळायचं असेल तर त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त व्हावं लागेल.

VIDEO: द्वारका मेट्रो स्टेशनजवळ अंदाधुंद गोळीबार, दोघांचा मृत्यू

First published: May 20, 2019, 8:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading