स्वातंत्र्यानंतर 72 वर्षांत टीम इंडियानं पहिल्यांदाच केली ही कामगिरी

स्वातंत्र्यानंतर 72 वर्षांत टीम इंडियानं पहिल्यांदाच केली ही कामगिरी

भारतानं टी20 पाठोपाठ विंडीजविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-0ने जिंकली.

  • Share this:

त्रिनिदाद, 15 ऑगस्ट : भारताने वेस्ट इंडीजविरुद्धची एकदिवसीय मालिका 2-0 ने जिंकली. भारतासाठी हा विजय खास ठरला. गेल्या 70 वर्षांत भारताने पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनी विजय मिळवला. 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर भारताला विजय मिळवता आला नव्हता. त्रिनिदादमध्ये झालेल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला पराभूत करून विजयी तिरंगा फडकवला.

कर्णधार विराट कोहलीनं मालिकेतील सलग दुसरं आणि त्याच्या वनडे कारकिर्दीतील 43 वं शतक साजरं केलं. त्यानं श्रेयस अय्यरच्या साथीने शतकी भागिदारी करून संघाला विजय मिळवून दिला. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार 14 ऑगस्टला सायंकाळी 7 वाजता सुरू झाला. या सामन्याचा निकाल मात्र 15 ऑगस्टला लागला. या सामन्यातील विजयासह टीम इंडियानं 72 वर्षांत पहिल्यांदा 15 ऑगस्टला खास भेट दिली.

भारताच्या संघानं स्वातंत्र्यदिनी खूप कमी सामने खेळले आहेत. यात एकदिवसीय क्रिकेटपेक्षा कसोटी सामन्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळं या दिवशी सामन्याचा निकाल लागलेला नाही. भारतानं आतापर्यंत 15 ऑगस्टला दोनच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले आहेत यातील पहिला सामना 1993 मध्ये झाला होता. तेव्हा लंकेविरुद्ध भारताला पराभव पत्करावा लागला होता. 15 ऑगस्टला भारताने आतापर्यंत 5 कसोटी सामने खेळले आहेत. या कसोटीचा निकाल स्वातंत्र्यदिनानंतर दोन ते तीन दिवसांनी लागला. यामध्ये एकही सामना भारताला जिंकता आलेला नाही. तर एक सामना बरोबरीत सुटला आहे.

स्वातंत्र्यदिनाशिवाय प्रजासत्ताकदिनी भारताने एकदिवसीय आणि टी20 सामने खेळले आहेत. 1986, 2000, 2015 आणि 2016 मध्या भारताचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाला होता. यात पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव तर तिसऱ्या सामन्याचा निकाल लागला नव्हता. 2016 मध्ये टी20 सामन्यात बारतानं विजय मिळवला होता. त्यानंतर 2017 ला इंग्लंडला पराभूत केलं होतं.

दौंड : कुरकुंभ MIDC मध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2019 11:49 AM IST

ताज्या बातम्या