इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला मिळणार नवा कोच, 8 नावं शॉर्टलिस्ट

इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला मिळणार नवा कोच, 8 नावं शॉर्टलिस्ट

इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारतीय महिला टीमला (Indian women's cricket team) नवा कोच मिळणार आहे. महिला टीमच्या हेड कोचच्या निवडीसाठी तयार करण्यात आलेल्या मदनलाल पॅनलनं (Madanlal panel) 8 नावं शॉर्टलिस्ट केली आहेत.

  • Share this:

मुंबई,13 मे : इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारतीय महिला टीमला (Indian women's cricket team) नवा कोच मिळणार आहे.  महिला टीमच्या हेड कोचच्या निवडीसाठी तयार करण्यात आलेल्या मदनलाल पॅनलनं (Madanlal panel) 8 नावं शॉर्टलिस्ट केली आहेत. यापैकी 4 जणांच्या मुलाखती बुधवारी झाल्या असून उर्वरित 4 जणांच्या मुलाखती गुरुवारी होणार आहेत. यंदा एखाद्या महिलेची मुख्य कोच म्हणून निवड होण्याची शक्यता आहे.

कोणती नावं शॉर्टलिस्ट?

मदनलाल पॅनलनं 35 अर्जापैकी 8 जण शॉर्टलिस्ट केली आहेत. यामध्ये 4 पुरुष आणि 4 महिला आहेत. ज्या 8 जणांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आलंय, त्यामध्ये विद्यमान हेड कोच WV रमन, रोमेश पवार, ऋषिकेश कानिटकर, अजय रात्रा, सुमन शर्मा, ममाथा माबेन, हेमलता काला आणि देविका वैद्य यांचा समावेश आहे. या सर्वांच्या मुलाखतीनंतर नव्या कोचची घोषणा करण्यात येईल.

महिला टीमच्या मुख्य कोचसाठी निवडण्यात आलेल्या पॅनलमध्ये मदनलाल, सुलक्षणा नाईक आणि आर.पी. सिंह यांचा समावेश होता. मात्र आरपी सिंह वडिलांचं निधन झाल्यानं मुलाखत घेण्यासाठी येऊ शकला नाही. तुषार आरोठे यांनी 2018 साली पद सोडल्यानंतर रोमेश पवारची कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र 2018 च्या T20 वर्ल्ड कप नंतर पोवारचे हरमनप्रीत कौर आणि मिताली राज यांच्याशी मतभेद झाले. त्यानंतर  WV रमन यांच्याकडं ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. अजर रात्रा आणि ऋषिकेश कानिटकर यांच्याकडे इंडिया ए आणि इंडिया अंडर - 19 टीमच्या प्रशिक्षणाचा अनुभव आहे.

कोरोनाच्या लढाईमध्येही विराटचा रेकॉर्ड, 6 दिवसात जमा केले तब्बल एवढे पैसे

इंग्लंड दौऱ्यावर जाणार टीम

WV रमन यांचा कार्यकाळ मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्येच संपला आहे. बीसीसीआयच्या आग्रहानंतर त्यांनी दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेत काम केलं. भारताध्ये झालेल्या वन-डे आणि टी-20 सीरिजमध्ये टीमचा पराभव झाला. आता त्यांनी पुन्हा एकदा अर्ज केला आहे. भारताची महिला टीम 2 जून रोजी 1 टेस्ट, 3 टी 20 आणि 3 वन-डे सीरिजसाठी इंग्लंडला रवाना होणार आहे.

Published by: News18 Desk
First published: May 13, 2021, 8:31 AM IST

ताज्या बातम्या