Home /News /sport /

IND W vs AUS W : ऑस्ट्रेलियन खेळाडूची कुंबळेसारखी जिद्द, जबडा फाटल्यानंतरही केली बॉलिंग VIDEO

IND W vs AUS W : ऑस्ट्रेलियन खेळाडूची कुंबळेसारखी जिद्द, जबडा फाटल्यानंतरही केली बॉलिंग VIDEO

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या महिला टीममधील झालेली तिसरी वन-डे (India Women vs Australia Women) टीम इंडियानं जिंकली आहे. पण, या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दाखवलेल्या झुंजार वृत्तीला सर्व सलाम करत आहेत.

    मुंबई, 26 सप्टेंबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या महिला टीममधील झालेली तिसरी वन-डे (India Women vs Australia Women) टीम इंडियानं जिंकली आहे. मिताली राजच्या (Mithali Raj) या टीमनं शेवटपर्यंत रंगलेल्या या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा 2 विकेट्सनं पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा या मॅचमध्ये पराभव झाला असला तरी त्यांच्या एका बॉलरनं जिगरबाज खेळ करत सर्वांचं मन जिंकलं आहे. ऑस्ट्रेलियाची बॉलर सोफी मोलिनिक्सनं (Sophie Molieneux) ही जिगरबाद वृत्ती दाखवली. ऑस्ट्रेलियाची फिल्डिंग सुरु असताना फिल्डरनं केलेला थ्रो तिच्या चेहऱ्याला लागला. हा थ्रो इतका जबरदस्त होता की सोफी मैदानातच कोसळली. त्यानंतर तिनं तातडीनं मैदान सोडले. सोफी आता पुन्हा मैदानात येणार नाही, असं वाटत होतं. पण थोड्याच वेळात ती चेहऱ्यावर बँडेज बांधून परत आली आणि तिनं तिच्या उर्वरित ओव्हर्स टाकल्या. ऑस्ट्रेलियाकडून शेवटची ओव्हर देखील सोफीनंच टाकली. या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर टीम इंडियानं ही मॅच जिंकली. सोफीनं 9.3 ओव्हर्समध्ये 41 रन देत शफाली वर्माची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. ऑस्ट्रेलियानं ही मॅच हरली असली तरी सोफीच्या या झुंजार वृत्तीनं सर्वांची मनं जिंकली आहेत. सोफीची ही झुंजार वृत्तीपाहून अनेक फॅन्सना टीम इंडियाचा माजी कॅप्टन अनिल कुंबळे (Anil Kumble) याची आठवण झाली आहे. 2002 साली वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या मॅचमध्ये कुंबळेचा जबडा बाऊन्सर लागल्यानं फुटला होता. तरही कुंबळेनं चेहऱ्याला बँडेज बांधत बॉलिंग केली. त्यानं त्या इनिंगमध्ये दिग्गज बॅट्समन ब्रायन लाराला आऊट करत ती टेस्ट ड्रॉ करण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. मिताली राजनं केली गांगुलीच्या पराक्रमाची बरोबरी, ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला! भारतानं या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा 2 विकेट्सनं पराभव करत ही ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला आहे. सलग 26 वन-डे जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा हा पराभव झाला आहे. दीप्ती शर्मा (Deepti Sharma) आणि स्नेह राणा (Sneh Rana) यांनी सातव्या विकेटसाठी केलेली 33 रनची पार्टनरशिप या अटीतटीच्या मॅचमध्ये निर्णायक ठरली. शेवटच्या ओव्हर्समध्ये आधी दिप्ती आणि नंतर स्नेह राणा आऊट झाल्यानं  मॅचमध्ये चुरस वाढली होती. पण अनुभवी झुलन गोस्वामीनं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तीन वन-डे मॅचची ही मालिका ऑस्ट्रेलियानं 2-1 अशी जिंकली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या