मुंबई, 30 सप्टेंबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India Women vs Australia Women) यांच्यातील एकमेव टेस्टला सुरुवात झाली आहे. भारतीय महिला टीमची पहिलीच डे-नाईट टेस्ट आहे. या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. भारताला स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि शफाली वर्मा (Shafali Verma) या जोडीनं चांगली सुरुवात केली.
भारतीय जोडीनं सुरुवातीला आक्रमण करत ऑस्ट्रेलियाला बॅकफुटवर ढकललं. यावेळी शफाली वर्मानं बदललेला बॅटींगचा स्टान्स पाहून नेटीझन्सना टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीची (Virat Kohli) आठवण आली. शफालीची या टेस्टमध्ये खेळण्याची पद्धत ही विराटसारखीच आहे. दोघांच्याही बॅटींग स्टाईलमधील साम्य दाखवणारा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायल झाला आहे. टीम इंडिया 2018 साली इंग्लंड दौऱ्यावर गेली होती. त्या दौऱ्यातील विराटच्या बॅटींग स्टान्ससारखा हा फोटो असल्याचं मत या फोटोवर नेटीझन्सनी व्यक्त केलं आहे.
Very very similar #AUSvIND pic.twitter.com/lIDfhWRnEe
— India Fantasy (@india_fantasy) September 30, 2021
या टेस्टमध्ये पहिल्याच दिवशी पावसाचा अडथळा आला. त्यापूर्वी स्मृती आणि शफाली या जोडीनं भारताला दमदार सुरुवात करुन दिली. स्मृतीनं सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियन बॉलर्सवर वर्चस्व गाजवलं. स्मृतीचा खेळ पाहून शफालीनं दुय्यम भूमिका बजावली. स्मृतीनं टेस्ट कारकिर्दीमधील तिसरं अर्धशतक 11 फोरच्या मदतीनं पूर्ण केलं पिंक बॉल टेस्टमध्ये अर्धशतक झळकावणारी स्मृती ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनली आहे.
स्मृती-शफाली जोडीनं पहिल्या विकेटसाठी 93 रनची पार्टनरशिप केली. त्यानंतर शफाली 31 रन काढून आऊट झाली. डिनर ब्रेकनंतर थोड्याच वेळात पावसाचा अडथळा आला. त्यापूर्वी भारतीय टीमनं 1 आऊट 132 रन केले होते. खेळ थांबला तेव्हा स्मृती मंधाना 80 तर पूनम राऊत 16 रनवर नाबाद होते.
कुछ खास है हम सभीं मे... पिंक बॉल टेस्टमधील हा 'रिअल' फोटो जिंकेल तुमचं मन!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs Australia