मुंबई, 30 सप्टेंबर : भारतीय महिला क्रिकेट टीमनं (Indian Women Team) ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकमेव टेस्टमध्ये (India W vs Australia W) चांगली सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियातील कॅरेरामध्ये ही टेस्ट होत आहे. भारतीय महिलांची ही पहिलीवाहिली डे-नाईट टेस्ट असल्यानं या टेस्टला ऐतिहासिक महत्त्व आहे. या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या शेवटच्या वन-डेमध्ये मध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या स्मृती मंधानानं (Smriti Mandhana) या टेस्टमध्येही लय कायम राखली आहे. स्मृतीनं सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियन बॉलर्सवर वर्चस्व गाजवलं. स्मृतीचा खेळ पाहून भारताची आक्रमक बॅटर शफाली वर्मानं (Shafali Verma) दुय्यम भूमिका स्विकारली.
स्मृतीनं टेस्ट कारकिर्दीमधील तिसरं अर्धशतक 11 फोरच्या मदतीनं पूर्ण केलं. स्मृती आणि शफाली जोडीनं भारताला चांगली सुरुवात करुन दिली आहे. स्मृतीनं मॅचच्या आठव्या ओव्हरमध्ये डर्सी ब्राऊनला चार फोर लगावले. भारतीय टीमकडून या टेस्टमध्ये बॅटर यास्तिका भाटिया आणि फास्ट बॉलर मेघना सिंह यांनी पदार्पण केलं आहे.
5⃣0⃣ for @mandhana_smriti! 👏 👏
The #TeamIndia left-hander is on a roll with the bat as she completes a quickfire half-century. 👍 👍 #AUSvIND Follow the match 👉 https://t.co/seh1NVa8gu pic.twitter.com/H79O2hG2kp — BCCI Women (@BCCIWomen) September 30, 2021
भारतीय टीम : स्मृती मंधाना, शफाली वर्मा, पूनम राऊत, मिताली राज (कॅप्टन), यास्तिका भाटिया, दीप्ति शर्मा, तानिया भाटिया (विकेटकीपर), पूजा वस्त्राकर, झूलन गोस्वामी, मेघना सिंह आणि राजेश्वरी गायकवाड
मिताली राजनं केली गांगुलीच्या पराक्रमाची बरोबरी, ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला!
ऑस्ट्रेलिया टीम : एलिसा हिली (विकेटकीपर), बेथ मूनी, मेग लानिंग (कॅप्टन), एलिसे पॅरी, ताहलिया मॅग्रा, एशले गार्डनर, अन्नाबेल सदरलैंड, सोफी मोलिनू, जॉर्जिया वेयरहैम, डार्सी ब्राउन आणि स्टेला कॅम्पबेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India