मुंबई, 2 ऑक्टोबर : भारतीय क्रिकेटर स्मृती मंधानानं (Smriti Mandhan) ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या टेस्टमध्ये (India Women vs Australia) शतक झळकावले आहे. या शतकानंतर तिनं अनेक विक्रमांची नोंद केली आहे. डे-नाईट टेस्टमध्ये शतक झळकावणारी स्मृती ही दुसरी भारतीय बनली असून पहिली महिला क्रिकेटपटू आहे. यापूर्वी फक्त विराट कोहलीनं (Virat Kohli) 2019 साली बांगलादेश विरुद्ध झालेल्या डे-नाईट टेस्टमध्ये शतक झळकावले आहे.
या खेळीनंतर स्मृती मंधानावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय क्रिकेटपटू हरलीन देओलनेही (Harleen Deol) स्मृतीच्या खेळीचंच नाही तर तिच्या लूकचंही कौतुक केलं आहे. 'एलेक्सा प्लीज प्ले ओ हसीना जुल्फों वाली' असं ट्वीट हरलीनने केलं. याचसोबत तिने स्मृती मंधानाचा शतकानंतर हेल्मेट काढून बॅट उंचावतानाचा फोटो शेयर केला आहे.
स्मृतीनं देखील हरलीनच्या या ट्विटरला मजेदार उत्तर दिलं आहे. 'एलेक्सा प्लीज म्यूट हरलीन देओल' असं उत्तर स्मृतीनं दिलं आहे. इंग्लंड विरुद्ध झालेल्या सीरिजमध्ये अविस्मरणीय कॅच घेतल्यानंतर हरलीन चर्चेत आली होती. सध्या सुरू असलेल्या टेस्टमध्ये तिचा भारतीय टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
Alexa please put @imharleenDeol on mute https://t.co/szmExAFOZg
— Smriti Mandhana (@mandhana_smriti) October 1, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.