Home /News /sport /

IND W vs AUS W: याला म्हणतात खेळ भावना! पूनम राऊतची कृती पाहून वाटेल अभिमान VIDEO

IND W vs AUS W: याला म्हणतात खेळ भावना! पूनम राऊतची कृती पाहून वाटेल अभिमान VIDEO

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2021) सध्या खेळ भावना (The spirit of the Game) म्हणजे काय? याचा वाद सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियात भारतीय खेळाडूनं याचं जबरदस्त उदारण सादर केलं आहे.

    मुंबई, 1 ऑक्टोबर :  इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2021) सध्या खेळ भावना (The spirit of the Game) म्हणजे काय? याचा वाद सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (KKR vs DC) या मॅचमध्ये हा वाद सुरू झाला. कोलकाताचा कॅप्टन इयन मॉर्गन (Eoin Morgan) याने दिल्लीचा बॉलर आर. अश्विनच्या (R. Ashwin) खेळ भावनेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर अश्विननं त्याला चोख उत्तर दिलं. आयपीएलमध्ये हा वाद सुरू असतानाच ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेटरनं 'खेळ भावना' म्हणजे काय हे दाखवून दिलं आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकमेव टेस्ट सध्या सुरू आहे. या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी भारतीय बॅटर पूनम राऊत (Punam Raut) हिनं खेळ भावनेचं सर्वोच्च उदाहरण जगाला दाखवलं आहे. या मॅचमधील 81 व्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाची स्पिनर सोफी मोलिनिक्सनं पूनम विरुद्ध कॅच आऊटचं अपिल केलं. सोफीसह ऑस्ट्रेलियन टीमला या अपिलावर फारसा विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी जोरदार अपिल केले नाही. त्याचबरोबर मैदानातील अंपायरनंही पूमन 'नॉट आऊट' असल्याचा निर्णय दिला होता. तरीही पूनमला ती आऊट झाल्याची जाणीव झाली. त्यानंतर तिनं खेळ भावना जपत मैदान सोडले. विशेष म्हणजे महिलांच्या टेस्ट क्रिकेटमध्ये अंपायरच्या निर्णयावर अपिल करण्यासाठी DRS ची सोय नाही. त्या पार्श्वभूमीवर पूनमची ही प्रामाणिक कृती खरोखरच कौतुकास्पद आहे. पूनमनं आऊट होण्यापूर्वी 165 बॉलमध्ये 36 रनची संयमी खेळी केली. तिनं स्मृती मंधाना (Smriti Mandhana) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 102 रनची पार्टनरशिप केली. स्मृती या टेस्टची भारताची स्टार आहे. तिनं तिच्या कारकिर्दीमधील पहिली टेस्ट सेंच्युरी झळकावली. IND W vs AUS W: स्मृती मंधानाची ऐतिहासिक खेळी, भारतीय क्रिकेटला मिळाली 'Goddess of the offside' स्मृती 127 रन काढून आऊट झाली. डे-नाईट टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावणारी स्मृती ही विराट कोहली (Virat Kohli) नंतरची दुसरी भारतीय असून पहिली महिला क्रिकेटपटू आहे.भारताकडून विराट कोहलीनं (Virat Kohli) पिंक बॉल टेस्टमध्ये पहिलं शतक झळकावलं होतं. त्यानं 2019 साली कोलकाता टेस्टमध्ये बांगलादेश विरुद्ध शतकी खेळी केली होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India vs Australia

    पुढील बातम्या