मुंबई, 26 सप्टेबर : मिताली राजच्या (Mithali Raj) भारतीय महिला क्रिकेट टीमनं (Indian Women Cricket Team) सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) टीमनं घडवलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. या टीमनं सलग 26 वन-डे जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमचा (Australia Women Team) विजयरथ रोखला आहे. गांगुलीच्या टीमनं 2001 साली कोलकाता टेस्टमध्ये सलग 16 टेस्ट जिंकणाऱ्या स्टीव्ह वॉच्या (Steve Waugh) ऑस्ट्रेलियन टीमला पराभूत केलं होतं. त्यानंतर 20 वर्षांनी भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियात जाऊन इतिहास रचला आहे.
दुसरी वन-डे अगदी शेवटच्या क्षणी हरलेल्या भारतीय टीमनं रविवारी तिसऱ्या वन-डेमध्ये इतिहास रचला. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा 2 विकेटनं पराभव केला. दीप्ती शर्मा (Deepti Sharma) आणि स्नेह राणा (Sneh Rana) यांनी सातव्या विकेटसाठी केलेली 33 रनची पार्टनरशिप या अटीतटीच्या मॅचमध्ये निर्णायक ठरली.
That is it!⁰⁰⚡️
Came agonisingly close in the 2nd ODI but have crossed the finish line NOW. #TeamIndia win the 3rd ODI by 2 wickets after a thrilling chase and with it end Australia’s marathon 26-match unbeaten streak. #AUSvIND pic.twitter.com/4b7QJxvX5w — BCCI Women (@BCCIWomen) September 26, 2021
शेवटच्या ओव्हर्समध्ये आधी दिप्ती आणि नंतर स्नेह राणा आऊट झाल्यानं मॅचमध्ये चुरस वाढली होती. पण अनुभवी झुलन गोस्वामीनं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तीन वन-डे मॅचची ही मालिका ऑस्ट्रेलियानं 2-1 अशी जिंकली आहे.
एका 'नो बॉल'मुळं झाला घोटाळा; भारताच्या पराजयानंतर पंचांवर भडकले फॅन्स
त्यापूर्वी ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटींग करताना भारतासमोर विजयासाठी 265 रनचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानात्मक टार्गेटचा पाठलाग करताना भारतीय टीमला शफाली वर्मा (Shafali Verma) आणि स्मृती मंधाना (Smriti Mandhana) जोडीनं दमदार सुरूवात करुन दिली. शफालीनं 56 रन काढले. तर स्मृती 22 रन काढून आऊट झाली.
ही जोडी फुटल्यानंतर यास्तिका भाटियाला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याची मॅनेजमेंटची चाल यशस्वी झाली. यास्तिकानं सर्वाधिक 64 रन काढले. कॅप्टन मिताली राज आणि रिचा घोष झटपट आऊट झाल्यानं भारतीय टीमची चिंता वाढली होती. मात्र त्यानंतर निर्णायक क्षणी दीप्ती आणि स्नेह राणानं पार्टनरशिप करत टीमला विजयाच्या जवळ नेलं. या दोघी आऊट झाल्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये मॅचमध्ये रंगत वाढली होती. त्यावेळी झुलन गोस्वामीनं भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news