मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /क्या बात है! भारतीय बॉलरनं टाकला 'Ball of The Century', पाहा VIDEO

क्या बात है! भारतीय बॉलरनं टाकला 'Ball of The Century', पाहा VIDEO

शिखानं (Shikha Pandey) ऑफ स्टंपच्या बराच बाहेर हा बॉल टाकला होता. पण तो हिलीच्या मिडल स्टंपवर आदळला. त्यामुळे हिलीला निराश होऊन परतावं लागलं.

शिखानं (Shikha Pandey) ऑफ स्टंपच्या बराच बाहेर हा बॉल टाकला होता. पण तो हिलीच्या मिडल स्टंपवर आदळला. त्यामुळे हिलीला निराश होऊन परतावं लागलं.

शिखानं (Shikha Pandey) ऑफ स्टंपच्या बराच बाहेर हा बॉल टाकला होता. पण तो हिलीच्या मिडल स्टंपवर आदळला. त्यामुळे हिलीला निराश होऊन परतावं लागलं.

मुंबई, 10 ऑक्टोबर: भारतीय महिला क्रिकेट टीम (Indian Women's Cricket Team) सध्या ऑस्ट्रेलियात आहे. दोन देशांमधील वन-डे सीरिज चांगलीच रंगतदार झाली. त्यानंतर झालेली एकमेव टेस्ट स्मृती मंधानाच्या (Smriti Mandhana) शतकामुळे भारतीय टीमनं गाजवली. सध्या दोन्ही देशांमध्ये टी20 सीरिज सुरू आहे. या सीरिजमधील पहिली मॅच पावसामुळे वाया गेली. त्यानंतर शनिवारी झालेल्या दुसऱ्या मॅचमध्ये टीम इंडियाची फास्ट बॉलर शिखा पांडेनं (Shikha Pandey) टाकलेल्या भन्नाट बॉलची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

शिखानं ऑस्ट्रेलियाची प्रमुख बॅटर एलिसा हिलीला हा बॉल टाकला. हिलीनं ऑस्ट्रेलिया इनिंगची सुरूवात फोर लगावून जोरदार केली. पण त्यानंतर शिखानं टाकलेल्या बॉलवर एलिसाची दांडी उडाली. शिखानं टाकलेला हा बॉल भन्नाट स्विंग झाला. शिखानं ऑफ स्टंपच्या बराच बाहेर हा बॉल टाकला होता. पण तो हिलीच्या मिडल स्टंपवर आदळला. त्यामुळे हिलीला निराश होऊन परतावं लागलं.

शिखानं टाकलेला हा बॉल सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. टीम इंडियाचा माजी खेळाडू वासिम जाफर (Wasim Jaffer) यानं या बॉलचं वर्णन शतकातील सर्वोत्तम बॉल (Ball Of The Century) असं केलं आहे.

शिखानं केलेल्या या भन्नाट सुरुवातीनंतरही टीम इंडियाला याचा फायदा उठवता आला नाही. टीम इंडियानं पहिल्यांदा बॅटींग करताना 9 आऊट 118 रन केले होते. ऑस्ट्रेलियानं हे आव्हान 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. भारताकडून पूजा वस्त्राकारनं सर्वाधिक 37 रन काढले. पूजानं 26 बॉलमध्ये तीन फोर आणि दोन सिक्सच्या मदतीनं ही खेळी केली. त्याशिवाय कॅप्टन हरमनप्रीत कौरनं 28 रनची खेळी केली.

IPL मध्ये सर्वात फास्ट बॉल टाकण्याचं मिळालं गिफ्ट, ‘या’ बॉलरचा टीम इंडियात समावेश

119 रनचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या यजमान टीमची सुरुवात खराब झाली. पण, नंतर त्यांनी मॅचमध्ये पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियाकडून ताहिल मॅकग्रानं 33 बॉलमध्ये 42 रन काढले. तर बेथ मूनीनं 34 रनची खेळी केली.

First published:

Tags: Cricket news, India vs Australia, Video viral