हरमनप्रीतचा 'सुपरकॅच' पाहून तुम्हीही म्हणाल, म्हारी छोरियां छोरों से कम हैं के?

भारताची कर्णधार हरमनप्रीतने सीमारेषेवर उंच उडी मारून एका हाताने घेतलेल्या कॅचची चर्चा होत असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 2, 2019 01:20 PM IST

हरमनप्रीतचा 'सुपरकॅच' पाहून तुम्हीही म्हणाल, म्हारी छोरियां छोरों से कम हैं के?

मुंबई, 02 नोव्हेंबर : भारताचा महिला क्रिकेट संघ सध्या विंडीज दौऱ्यावर आहे. शुक्रवारी पहिला एकदिवसीय सामना व्हिवियन रिचर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर झाला. या सामन्यात भारताला अवघ्या एका धावेनं पराभव पत्करावा लागला. मात्र, या सामन्यात चर्चा झाली ती हरमनप्रीत कौरने सीमारेषेवर घेतलेल्या कॅचची. विंडीजच्या डावाच्या अखेरच्या चेंडूवर हरमनप्रीतने हवेत उंच उडी मारून एका हाताने झेल घेतला.

विंडीजने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 225 धावा केल्या. खरंतर यात आणखी 6 धावांची भर पडली असती पण भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने सीमारेषवर अप्रतिम असा झेल घेतल्यानं त्यांचा डाव 225 धावांवर थांबला.

विंडीजची कर्णधार स्टेफनी टेलरनं या सामन्यात झंझावाती 94 धावांची खेळी केली. तिला शतकासाठी एका षटकाराची गरज होती. टेलरनं मोठा फटका मारला पण सीमारेषेवर उभा असलेल्या हरमनप्रीतने झेल घेतला आणि तिचं शतक हुकलं.

भारताचा संघ 225 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरला पण संघाला एक धाव कमी पडली. भारताकडून प्रिया पुनियाने सर्वाधिक 75 धावा केल्या. याशिवाय जेमिमा रॉड्रिग्जने 41 धावा केल्या. दोघींच्या खेळीमुळे भारताला विजयाच्या आशा निर्माण झाल्या. पण अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताला 224 धावा करता आल्या. फक्त एका धावेनं विंडीजने सामना जिंकला.

Loading...

गोलंदाजाला टाकलं गोंधळात, पाठ दाखवून मारला चौकार; VIDEO पाहिलात का?

'धोक्याकडे दुर्लक्ष करू नका, तर..', BCCI वर भडकली बॉलिवूड अभिनेत्री

पाकच्या गोलंदाजावर भारतीय संस्कार! फलंदाजाला बाद करताच करतो 'हे' काम, पाहा VIDEO

सोशल मीडियावर अनुष्का का आणि कुणावर संतापली, पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2019 01:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...