Home /News /sport /

IND W vs ENG W: शेवटच्या सत्रामध्ये टीम इंडियाचं कमबॅक, पदार्पणातच स्पिनर्सचा जलवा

IND W vs ENG W: शेवटच्या सत्रामध्ये टीम इंडियाचं कमबॅक, पदार्पणातच स्पिनर्सचा जलवा

सात वर्षांनंतर टेस्ट क्रिकेटसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय महिलांनी (Indian Women Team) ब्रिस्टल टेस्टच्या पहिल्या दिवशी कमबॅक केले.

    ब्रिस्टल 17 जून : सात वर्षांनंतर टेस्ट क्रिकेटसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय महिलांनी (Indian Women Team) ब्रिस्टल टेस्टच्या पहिल्या दिवशी कमबॅक केले. पहिल्या दिवसाच्या दोन सत्रावर इंग्लंडनं वर्चस्व गाजवलं. त्यानंतर टीम इंडियानं शेवटच्या सत्रामध्ये चार विकेट्स घेतल्या. पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या दीप्ती शर्मा (Deepti Sharma) आणि स्नेह राणा (Senh Rana) या स्पिनर्सची जोरदार कामगिरी हे पहिल्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. ब्रिस्टल टेस्टमध्ये इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला.  दिवसाच्या सुरुवातीलाच स्मृती मंधानाने (Smriti Mandhana मोठी चूक केली.  मंधानाने  इंग्लंडची ओपनर विनफिल्ड हिलचा सोपा कॅच सोडला. झूलन गोस्वामीच्या (Jhulan Goswami) बॉलिंगवर विनफिल्डच्या बॅटची कडा घेऊन बॉल पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या स्मृतीच्या हातात गेला, पण तिला हा अगदी सहज असलेला कॅच पकडता आला नाही. विकेटकिपर तानिया भाटियानं पूजा वस्त्रकारच्या बॉलिंगवर एक अफलातून कॅच घेत विनफिल्डला 36 रनवर परत पाठवलं. त्यानंतर ओपनर टॅमी ब्युमोट आणि इंग्लंडची कॅप्टन हिथर नाईट (Heather Knight) यांची जोडी जमली. या दोघींनी दुसऱ्या विकेट्ससाठी 71 रनची पार्टनरशिप केली. ब्युमोट आऊट झाल्यानंतर हिथरनं नॅट स्किवेरसोबत तिसऱ्या विकेटसाठी 90 रनची पार्टरनशिप केली. इंग्लंडची स्थिती 2 आऊट 230 अशी भक्कम असताना भारतीय महिलांनी कमबॅक केले. मिताली-झूलनची ऐतिहासिक कामगिरी, गांगुली-द्रविड-कुंबळेचा विक्रम मोडला दीप्ती-स्नेहचा जलवा टीम इंडियाकडून पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या दीप्ती शर्मा आणि स्नेह राणा या स्पिनर्सच्या जोडीनं शेवटचे सेशन गाजवले. दीप्तीनं नॅट स्किवेरला आऊट करत भारताला तिसरं यश मिळवून दिलं. कॅप्टन हिथर नाईटची सेंच्युरी 5 रननं हुकली. तिलाही दीप्तीनंच आऊट केले. पहिल्या दिवसाखेऱ भारताकडून दीप्तीनं 2 तर स्नेह राणानं 3 विकेट्स घेतल्या. आता दुसऱ्या दिवशी सकाळी इंग्लंडची लोअर ऑर्डर झटपट गुंडाळण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असेल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, India vs england

    पुढील बातम्या