Home /News /sport /

IND vs ENG: द्रविडच्या ‘या’ खास माणसामुळे सुधारली टीम इंडियाची फिल्डिंग, इंग्लंड विरुद्ध दिसली जादू

IND vs ENG: द्रविडच्या ‘या’ खास माणसामुळे सुधारली टीम इंडियाची फिल्डिंग, इंग्लंड विरुद्ध दिसली जादू

भारतीय महिला टीमनं (Indian Women Team) इंग्लंड दौऱ्यात जोरदार फिल्डिंग करत सर्वांची मनं जिंकली आहेत. इंग्लंड विरुद्ध झालेल्या दोन टी20 सामन्या टीम इंडियानं अविश्वसनीय फिल्डिंग केली आहे.

    मुंबई, 12 जुलै: भारतीय महिला टीमनं (Indian Women Team)  इंग्लंड दौऱ्यात जोरदार फिल्डिंग करत सर्वांची मनं जिंकली आहेत. इंग्लंड विरुद्ध झालेल्या दोन टी20 सामन्यात टीम इंडियानं अविश्वसनीय फिल्डिंग केली आहे. पहिल्या टी20 सामन्यात हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि हरलीन देओल (Harleen Deol) यांनी अशक्य कॅच पकडले होते. हरलीन देओलच्या कॅचची तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही दखल घेतली होती. रविवारी झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यातही टीम इंडियानं जोरदार फिल्डिंग केली. टीम इंडियाने या सामन्यात तब्बल 4 रन आऊट केले. ऋचा घोष, दीप्ती शर्मा, स्मृती मंधाना आणि हरलीन देओल या चार जणींनी हे रन आऊट केले. टीम इंडियाच्या फिल्डिंगचा दर्जा सुधारण्याचे श्रेय राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) जवळच्या सहकाऱ्याचं आहे. टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौरनंच पहिल्या टी20 सामन्यानंतर याबाबतची माहिती दिली होती. टीम इंडियाचे फिल्डिंग कोच अभय शर्मा (Abhay Sharma) यांना तिने हे श्रेय दिले होते. अभय शर्माने भारतीय पुरुष क्रिकेट टीमसोबत ज्यूनिअर लेव्हलसाठी काम करणाऱ्या राहुल द्रविडच्या टीमचे सदस्य आहेत. ते इंडिया ए आणि अंडर-19 या दोन्ही टीमचे फिल्डिंग कोच आहेत. इंग्लंड दौऱ्यापूर्वी त्यांची महिला टीमचे फिल्डिंग कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अभय शर्मानं दिल्ली आणि रेल्वे या दोन टीमकडून विकेटकिपर-बॅट्समन म्हणून क्रिकेट खेळले आहे. 1990 च्या दशकात टीम इंडियाला विकेट किपरची गरज होती. त्यावेळी ते देखील या जागेसाठी दावेदार होते. मात्र साबा करीम, एमएसके प्रसाद, अजय रात्रा यांनी या शर्यतीमध्ये बाजी मारली. 6 महिन्यांची झाली Vamika, अनुष्कानं शेअर केला विराट सोबतचा गोड Photo शर्मा यांनी 89 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 35.38 च्या सरासरीने 4105 रन काढले आहेत. यामध्ये 9 शतक आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर शर्मा यांनी 145 कॅच पकडले असून 34 स्टंपिंग देखील केले आहेत. त्यांनी 40 A लिस्टच्या मॅचमध्ये 23.63 च्या सरासरीनं 780 रन केले. यामध्ये 20 कॅच आणि 11 स्टंपिगचा समावेश आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, India vs england, Rahul dravid

    पुढील बातम्या