IND vs WI : 'धोनीची अनुपस्थिती हीच योग्य वेळ', विराटचा ऋषभ पंतला सल्ला; पाहा VIDEO

IND vs WI : 'धोनीची अनुपस्थिती हीच योग्य वेळ', विराटचा ऋषभ पंतला सल्ला; पाहा VIDEO

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी20 मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे.

  • Share this:

जमैका, 03 ऑगस्ट : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला टी 20 सामना शनिवारी होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले की, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला आता तीनही प्रकारात त्याची क्षमता दाखवण्याची वेळ आहे आहे. धोनीच्या निवृत्तीबद्दल सध्या काही स्पष्ट नसलं तरी भविष्यात यष्टीरक्षणाची जबाबदारी पंतच्या खांद्यावर असणार आहे. निवड समितीनेसुद्धा संघ जाहीर केल्यानंतर पंतच्या जबाबदारीबद्दल वक्तव्य केलं होतं.

विराट सामन्यापूर्वी म्हणाला की, ऋषभ पंतसाठी ही मोठी संधी आहे. त्याच्या क्षमतेनं खेळल्यास त्याची कारकिर्द मोठी होईल. पंतने त्याची क्षमता दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे. आम्हाला त्याच्या क्षमतेबद्दल माहिती आहे आणि त्यानं भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करावी अशी आमची इच्छा आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक धोनीने वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेतली आहे. त्याच्याबद्दल विराट म्हणाला की, धोनीचा अनुभव संघासाठी नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. आता युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. त्यासाठी त्यांनी तयार राहिलं पाहिजे.

विंडीज दौऱ्यावर दाखल होण्यापूर्वी विराट म्हणाला होता की, श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे या खेळाडूंसाठी एक चांगली संधी आहे. भारतीय संघातील मधल्या फळीत हे खेळाडू दावा करू शकतात.

वर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघ पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. वर्ल्ड कपमधील पराभवाबद्दल सांगताना कोहली म्हणाला की, वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर सुरुवातीचे दिवस कठीण होते. स्पर्धा संपेपर्यंत जेव्हा झोपेतून जाग यायची तेव्हा खूप वाईट वाटायचं. आम्ही खेळाडू आहोत त्यामुळं हार-जीत होतच असते याची जाणीव ठेवून पराभव मान्य करून पुढं वाटचाल केली. प्र्यतेक संघाला पुढं जायचं असतं असंही विराट म्हणाला.

'कांबळ्या...', Friendship Dayआधी जुन्या आठवणींना सचिन झाला भावुक!

India vs West Indies 1st T20 Live Score : भारत-वेस्ट इंडिज आज भिडणार, 'या' चॅनलवर पाहू शकता लाईव्ह मॅच

VIDEO: मैत्रीसमोर पाऊसही फिका, सच्चा दोस्तांनी ठाणे स्टेशनवरच साजरा केला बर्थडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 3, 2019 04:31 PM IST

ताज्या बातम्या