INDvsWI : संघ निवडीवर गांगुलीचा आक्षेप, 'या' 2 खेळाडूंना संधी न दिल्यानं भडकला!

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने संघ निवड ही सर्वांना खूश करण्यासाठी नसल्याचं म्हणत वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी निवडलेल्या संघावर आक्षेप घेतला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 24, 2019 12:28 PM IST

INDvsWI : संघ निवडीवर गांगुलीचा आक्षेप, 'या' 2 खेळाडूंना संधी न दिल्यानं भडकला!

मुंबई, 24 जुलै : वर्ल्ड कपनंतर आता भारतीय संघ ऑगस्टमध्ये वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी भारतीय संघ रविवारी जाहीर करण्यात आला. या निवडीवर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने प्रश्न उपस्थित केला आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारताचे युवा खेळाडू शुभमन गिल आणि अजिंक्य रहाणेचा एकदिवसीय संघात समावेश करायला हवा होता असं गांगुलीने म्हटलं आहे.

भारतीय संघाच्या निवडीबद्दल ट्वीट करत गांगुलीने म्हटलं की, भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत जे तीनही प्रकारात खेळू शकतात. एकदिवसीय संघात गिल आणि रहाणे हे दोन खेळाडू नसल्यान आश्चर्य वाटलं. या खेळाडूंना तीनही प्रकारात संधी द्यावी अशी मागणी गांगुलीने केली.

खेळाडूंमध्ये आत्मविश्वास कायम राखण्यासाठी त्यांना तीनही संघामध्ये घ्यावं असं गांगुलीने म्हटलं आहे. गांगुलीच्या मते, काहीच खेळाडू तीनही प्रकारात खेळत आहेत. बलाढ्य संघांकडे सतत खेळणारे खेळाडू असतात. संघ निवड ही सर्वांना खूश करण्यासाठी नाही तर देशासाठी सर्वोत्कृष्ट संघ निवडणे आणि नेहमी चांगली कामगिरीसाठी असते.

Loading...

वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या संघावरून अनेकांनी टीका केली आहे. संघात शुभमन गिलला संधी न दिल्यानं दिग्गजांच्या भुवया उंचावल्या आहेत. गिल सध्या फॉर्ममध्ये असून त्याने वेस्ट इंडीज ए विरुद्ध इंडिया ए संघातून खेळताना सर्वाधिक 218 धावा केल्या आहेत.

गिलनेसुद्धा मंगळवारी म्हटलं होतं की, वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी संघात निवड न झाल्यानं आपण निराश आहे. त्याला कमीत कमी एका संघात तरी स्थान मिळण्याची अपेक्षा होती. सलग चांगली कामगिरी करून निवड समितीचं लक्ष वेधून घेण्याची आशा त्यानं व्यक्त केली होती.

VIDEO : प्रतिस्पर्ध्याचा जीवघेणा पंच, बॉक्सरचा झाला मृत्यू!

भारताच्या 3 दिग्गज खेळाडूंचा पहिला टी20 सामना ठरला होता अखेरचा!

VIDEO: ओव्हरटेक करण्याच्या नादात कलंडली बस, पाहा पुढे काय झालं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2019 12:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...