रोहित शर्माने ऋषभ पंतला हासडली शिवी, स्टंमच्या कॅमेऱ्यात झालं रेकॉर्ड

रोहित शर्माने ऋषभ पंतला हासडली शिवी, स्टंमच्या कॅमेऱ्यात झालं रेकॉर्ड

रोहित शर्माने 159 धावा करून भारताच्या विजयाचा पाया भरला. परंतु, या सामन्यात त्याने एक चूक केली.

  • Share this:

विशाखापट्टणम, 19 डिसेंबर : वेस्ट इंडिज विरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने 107 धावांनी विजय मिळवला. रोहित शर्माने 159 धावा करून भारताच्या विजयाचा पाया भरला. रोहितने आपल्या कारकिर्दीतले एकदिवसीय सामन्यातील हे 28 शतक होतं. एवढंच नाहीतर सलामीला खेळत असताना एक वर्षात त्याने 10 शतक झळकावण्याचा रेकॉर्ड ही केला आहे. परंतु, या सामन्यात त्याने एक चूक केली. रोहितने ऋषभ पंत भर मैदानात शिवी हासाडली.

वेस्ट इंडिजची फलंदाजी सुरू असताना रोहित शर्माने ऋषभ पंतवर नाराज होऊन चक्क शिवी दिली. रोहितचा आवाज हा स्टंपच्या माइकमध्ये कैद झाला आहे. बघता बघता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पण, रोहितने पंतला का शिवी दिली? त्याचं कारणही तसं सापडलं आहे. जेव्हा विंडीजचा संघ 33 षटकावर खेळत होतो तेव्हा होल्डरने लेग साइडवर एक धाव काढली. पंतने  चेंडू पकडला आणि गोलंदाजाकडे फेकला. बस, एवढ्याशा गोष्टीवर रोहित शर्मा नाराज झाला.  रोहितला वाटत होतं की, त्याने फलंदाजी करणाऱ्याच्या दिशेनं चेंडू फेकायला हवा होता, जेणे करून होप तिथे धावबाद झाला असता, त्यामुळे रोहित पंतवर चांगलाच भडकला.

परंतु, या चुकीनंतर पंतने सामन्याचा चेहरामोहराच बदलून टाकला. कुलदीपने पुढच्या षटकामध्ये 3 चेंडूवर हॅटट्रिक साधत शे होप, जेसन होल्डर आणि अल्जारी जोसफला बाद केलं.

याआधीही रोहितने दिली शिवी

रोहितने कुठल्या खेळाडूला शिवी दिली हे काही पहिल्यांदाच घडलं नाही. याआधीही त्याने असे प्रकार केले होते. चेन्नईमध्ये त्याच्या तोंडून शिवी निघाली होती. त्यावेळी तो फलंदाजी करत होता. तेव्हा पोलार्ड त्याच्याजवळ येऊन

वेगळ्याच पद्धतीने हावभाव केले होते. पोलार्ड तिथून गेल्यानंतर रोहित शर्माने चक्क शिवी हासडली होती. मैदानावर अशा घटना नेहमी घडत असतात. याआधीही कर्णधार विराट कोहलीने खेळाडूंना शिव्या देऊन टीकेचा धनी झाला होता.

केएल राहुलने वेगळ्याच पद्धतीने केलं सेलिब्रेशन

भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज केएल राहुलने वेस्ट इंडीज विरुद्ध दमदार खेळी करत शतक झळकावले आहे.  104 चेंडूत त्याने 8 चौकार आणि 3 षटकार लगावत खणखणीत 102 धावा केल्यात.  शतक झळकावल्यानंतर राहुलने वेगळ्याच अंदाजात जल्लोष केला.

केएल राहुलचं हे तिसरं शतक होतं आणि भारतात हे पहिलं शतक होतं.  रोहित शर्मासोबत त्याने 227 धावांची भागिदारी केली. शतक झाल्यानंतर राहुलने जरा हटकेच जल्लोष केला. त्याने आधी प्रेक्षकांकडे पाहून बॅट उंचावली आणि आभार मानले. त्यानंतर रोहितची गळाभेट घेतली.  त्यानंतर राहुलने हेल्मेट आणि बॅटला खाली ठेवलं. दोन्ही हात कानाला लावले. असं वाटत होतं की, ते आवाज ऐकू येऊ नये म्हणून कान दाबले असावे. असंही सांगितलं जातंय की, टीकाकारांच्या टीकांना राहुलने न ऐकण्यासाठी हे उत्तर दिलं.

फुटबॉलपटू कोटिन्‍होची कॉपी?

भारताच्या खेळीनंतर समालोचक इयान बिश्पने राहुलला याबद्दल विचारले असता त्याने यावर बोलण्याचं टाळलं. फक्त एवढंच उत्तर दिलं की, 'याबद्दल कुणाला कळू देऊ नका, हे गुढचं राहु द्या.' सोशल मीडियावर याबद्दलही चर्चा झाली. ब्राझिलचा फुटबॉलपटू फिलिप कोटिन्होची राहुलने कॉपी केली.  कोटिन्‍हो हा फुटबॉल क्‍लब बार्सिलोनाकडून खेळत होता आणि जर्मनीच्या  फुटबॉल क्‍लब बायर्न

म्‍यूनिकसोबतही आहे. गोल केल्यानंतर कोटिन्हो हा दोन्ही कानावर हात ठेवून जल्लोष करत होता.

रोहित-राहुलचे शतक

भारताने प्रथम फलंदाजी करत धडाकेबाज खेळी केली. रोहित शर्मा आणि केएल राहुलने विंडीजच्या गोलंदाजांची धुलाई केली. रोहित शर्माने 138 चेंडूमध्ये 5 षटकार आणि 17 चौकार लगावून 159 धावा केल्यात. तर केएल राहुलने 104 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकार लगावत तडाखेबाज 102 धावा केल्या. रोहित आणि केएल राहुलने 227 धावांची भागिदारी केली. राहुलने आपल्या कारकिर्दीतले तिसरे शतक ठोकले तर रोहितने 28 वे शतक झळकावले. त्यानंतर मधल्या फळीतील श्रेयस अय्यरने 53 तर पंतने  39 धावा करून बाद झाले. पंतने 16 चेंडूमध्ये तडाखेबाज खेळी करत 39 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने 28 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावले. भारताने हा सामना 107 धावांनी जिंकला आणि मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.

Published by: sachin Salve
First published: December 19, 2019, 7:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading