विश्वास बसणार नाही; टी-20मध्ये के.एल.राहुल मोडणार विराटचा विक्रम

विश्वास बसणार नाही; टी-20मध्ये के.एल.राहुल मोडणार विराटचा विक्रम

वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या पहिल्या टी-20 मध्ये भारतीय ओपनर के.एल.राहुल याला एक खास विक्रम स्वत:च्या नावावर करण्याची संधी आहे.

  • Share this:

हैदराबाद, 05 डिसेंबर: वेस्ट इंडिजविरुद्ध हैदराबाद (Hyderabad T20)येथे होणाऱ्या पहिल्या टी-20 मध्ये भारतीय ओपनर के.एल.राहुल (KL Rahul)याला एक खास विक्रम स्वत:च्या नावावर करण्याची संधी आहे. हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये उद्या 6 डिसेंबर रोजी होणाऱ्या सामन्यात राहुलने 26 धावा केल्यास त्याच्या आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये एक हजार धावा पूर्ण होतील. राहुलने एक हजार धावा पूर्ण केल्यास तो भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)आणि महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) या दिग्गज खेळाडूंना मागे टाकू शकेल.

वेस्ट इंडिजविरुद्धची टी-20 राहुलच्या करिअरमधील 31वी टी-20 असेल. त्याने आतापर्यंत 28 डावात 974 धावा केल्या आहेत. राहुलची सरासरी 42.34 तर स्ट्राईक रेट 145.37 इतका आहे. त्याने 2 शतकी खेळी आणि 6 अर्धशतक झळकावली आहेत. हैदराबाद टी-20 सामन्यात जर त्याने 26 धावा केल्या तर तो टी-20 कमी वेळेत 1 हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरेल. असे जर झाले तर राहुल 3 वर्ष 5 महिन्यात टी-20 एक हजार धावा पूर्ण करेल. विराटने अशी कामगिरी करण्यास 5 वर्ष 112 दिवस इतका वेळ घेतला होता. याबाबत पाकिस्तानचा बाबर आजम (Babar Azam)हा पहिल्या स्थानावर आहे. त्याने 2 वर्ष 58 दिवसात टी-20 क्रिकेटमध्ये 1 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

सर्वात कमी डावात टी-20 क्रिकेटमध्ये एक हजार धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांमध्ये देखील बाबर पहिल्या स्थानावर आहे. त्याने 26 सामन्यात ही कामगिरी केली आहे. तर विराटने 29 सामन्यातील 27 डावात एक हजार धावा केल्या होत्या. जर राहुलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात राहुलने जर 27 धावा केल्या तर 32 सामन्यातील 29 डावात त्याच्या एक हजार धावा होतील. तसेच टी-20 एक हजार धावा करणारा तो सातवा भारतीय ठरेल. याआधी रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्र सिंग धोनी, शिखर धवन, सुरेश रैना आणि युवराज सिंग यांनी अशी कामगिरी केली आहे.

रोहित शर्माच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड

टी-20मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताच्या रोहित शर्मा याच्या नावावर आहे. रोहितने टी-20मध्ये 2 हजार 539 धावा केल्या आहेत. या क्रमवारीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 2 हजार 450 धावा केल्या आहेत. तर धोनीने 1 हजार 617, रैनाने 1 हजार 605 आणि शिखर धवने याने 1 हजार 504 तर युवराज सिंगने 1 हजार 177 धावा केल्या आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी-20 सामना हैदराबाद येथे, दुसरा तिरुवनंतपूरम येथे तर तिसरा सामना मुंबईत होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 5, 2019 04:09 PM IST

ताज्या बातम्या