INDvsWI 2nd T20 : पावसामुळे सामना थांबला, विंडीजला 27 चेंडूत 70 धावांची गरज

INDvsWI 2nd T20 : पावसामुळे सामना थांबला, विंडीजला 27 चेंडूत 70 धावांची गरज

भारताचा सलामीवीर रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर विंडीजसमोर 168 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

  • Share this:

फ्लोरीडा, 04 ऑगस्ट : विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात पावसाने व्यत्यय आला. भारताने दिलेल्या 168 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजच्या 15.3 षटकांत 4 बाद 92 धावा झाल्या असताना पावसाला सुरुवात झाली. यामुळं सामना थांबवण्यात आला. यावेळी पोलार्ड 8 धावांवर तर हेटमायर 6 धावांवर खेळत होते. विंडीजला सामना जिंकण्यासाठी 27 चेंडूत 70 धावांची गरज आहे. जर सामना सुरू झाला नाही तर डकवर्थ लुईस नियमानुसार भारत आहे या परिस्थितीत 28 धावांनी जिंकेल.

विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या टी20  सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा सलामीवीर रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 5 बाद 167 धावांपर्यंत मजल मारली. भारताचे सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी सहा षटकांत 50 धावांची भागिदारी केली. धवन बाद झाल्यानंतर रोहित शर्माने अर्धशतक केलं. धवन 23 धावांवर बाद झाला. त्यानंतर कोहली आणि रोहित शर्माने सघाचं शतक धावफलकावर लावलं. रोहित शर्मा 67 धावांवर बाद झाला.

ऋषभ पंत पुन्हा एकदा अपयशी ठरला. पहिल्या सामन्यात खातं न उघडणाऱ्या पंतने या सामन्यात 4 धावा केल्या. त्यानंतर कोहलीचा 23 धावांवर कॉट्रेलनं त्रिफळा उडवला. अखेरच्या षटकात कृणाल पांड्या आणि रविंद्र जडेजाने  तीन षटकार मारून संघाच्या धावसंख्येत भर घातली. पांड्या 20 धावांवर तर जडेजा 9 धावांवर नाबाद राहिले.

विडींजविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने 4 गडी राखून विजय मिळवला. विंडीजने दिलेलं 96 धावांचं आव्हान भारताने 17.2 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. विंडीजला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 बाद 95 धावा करता आल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारतीय फलंदाजसुद्धा धडपडत होते.

राज्यात पावसाचा धुमाकूळ, येत्या 48 तासांत 'या' जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा, महत्त्वाच्या टॉप18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 4, 2019 11:30 PM IST

ताज्या बातम्या