Home /News /sport /

U19 World Cup: भारतीय क्रिकेटचा नवा ‘राज’, 22 बॉलमध्ये काढले 104 रन! टीम इंडियाचा 326 रनने विजय

U19 World Cup: भारतीय क्रिकेटचा नवा ‘राज’, 22 बॉलमध्ये काढले 104 रन! टीम इंडियाचा 326 रनने विजय

अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये (U19 World Cup 2022) टीम इंडिया मैदानाबाहेर कोरोना संकटात आहे. या संकटाचा कोणताही परिणाम टीमच्या कामगिरीवर झालेला नाही. भारतीय टीमनं ग्रुप B मधील शेवटच्या मॅचमध्ये युगांडाचा 326 रनने दणदणीत पराभव केला.

    मुंबई, 23 जानेवारी : अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये (U19 World Cup 2022)  टीम इंडिया मैदानाबाहेर कोरोना संकटात आहे. या संकटाचा कोणताही परिणाम टीमच्या कामगिरीवर झालेला नाही. भारतीय टीमनं ग्रुप B मधील शेवटच्या मॅचमध्ये युगांडाचा 326 रनने दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या भारतीय टीमनं 50 ओव्हर्समध्ये 5 आऊट 405 रन काढले. त्याला उत्तर देताना युंगाडाची टीम 19.4 ओव्हर्समध्ये फक्त 79 रनवरच ऑल आऊट झाली. टीम इंडियाचा नवा ‘राज’ भारतीय टीममधील दोन जणांनी दमदार शतक करत ही मोठी धावसंख्या उभारली. फॉर्मातील अंगकृष रघुवंशी (144) आणि राज बावा (नाबाद 162) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 206 रनची भागिदारी केली. टीम इंडियाने यापूर्वीच क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता, पण दुबळ्या युगांडा विरुद्ध दमदार खेळ करण्याची संधी टीमने सोडली नाही. ओपनर बॅटर अंगकृष रघुवंशीनं 120 बॉलमध्ये 22 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 144 रन केले. त्याला राज बावाने भक्कम साथ दिली. राजने फक्त 108 बॉलमध्ये 14 फोर आणि 8 सिक्सच्या मदतीने नाबाद 162 रन काढले. त्याने यामधील 104 रन हे फक्त 22 बॉलच्या मदतीने पूर्ण केले. धवनचा मोडला रेकॉर्ड 19 वर्षांचा राज अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून सर्वात जास्त वैयक्तिक रन करणारा बॅटर बनला आहे. त्याने शिखर धवनचा (Shikhar Dhawan) रेकॉर्ड मोडला. धवनने अंडर 19 वर्ल्ड कप 2004 मध्ये स्कॉटलंड विरुद्ध 155 रनची खेळी केली होती. भारत आणि विंडीज मालिकेचे नवे वेळापत्रक जाहीर, एकाच मैदानावर खेळणार 3 सामने! त्याचबरोबर राजने अंडर 19 वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वोच्च वैयक्तित स्कोअर देखील केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा जॅक रूडोल्फ आणि ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून व्हाईट यांच्या नावावर या विक्रमाची नोंद होती. रूडोल्फने 2000 साली नेपाळ विरुद्ध तर व्हाईटने 2002 साली स्कॉटलंड विरुद्ध 156 रनची खेळी केली होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Team india

    पुढील बातम्या