कोलंबो, 29 जुलै : टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यात सहापैकी पाच सामन्यात कोणत्या तरी भारतीय क्रिकेटपटूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. श्रीलंका विरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात देखील आणखी एका खेळाडूला संधी मिळाली आहे. या सामन्यात संदीप वॉरियर (Sandeep Warier) यानं पदार्पण केलं आहे. नवदीप सैनी (Navdeep Saini) दुसऱ्या सामन्यात जखमी झाल्यानं त्याच्या जागी संदीपचा समावेश करण्यात आला आहे.
संदीप वॉरियरचा श्रीलंका दौऱ्यात नेट बॉलर म्हणून समावेश करण्यात आला होता. मात्र टीम इंडियाला कोरोनाचा फटका बसल्यानं नऊ खेळाडूंना आयसोलेशनमध्ये जावं लागलं. या कारणामुळे संदीपचा मंगळवारीच मुख्य टीममध्ये समावेश करण्यात आला होता. आता त्यानंतर लगेच त्याला अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली.
संदीपला मॅचपूर्वी (Shikhar Dhawan) टीम इंडियाची कॅप देण्यात आली. त्यावेळी संदीप चांगलाच भावुक झाला होता. आयुष्यातील या मोठ्या प्रसंगी त्याला अश्रू अनावर झाले. या इमोशनल प्रसंगाचा व्हिडीओ बीसीसीआयनं (BCCI) शेअर केला आहे.
Tears of joy! ☺️
The wait is finally over. Welcome to international cricket, Sandeep Warrier. 👏 👏 Go well! 👍 👍 #TeamIndia #SLvIND Follow the match 👉 https://t.co/E8MEONwPlh pic.twitter.com/KwHAnlO3ZQ — BCCI (@BCCI) July 29, 2021
कोण आहे संदीप?
देशांतर्गत क्रिकेटमध्ये केरळचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संदीपला 9 वर्षांचा अनुभव आहे. त्याने 57 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 186 विकेट्स घेतल्या आहेकत. त्याचबरोबर 55 लिस्ट A मॅचमध्ये 66 तर 54 टी20 मध्ये 53 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. मागील फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने जोरदार कामगिरी करत 44 विकेट्स घेतल्या होत्या.
संदीपनं 2019 साली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) कडून तीन सामने खेळले होते. त्या तीन सामन्यात त्यानं दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर तो मागील आयपीएल सिझनपासून (IPL 2020) कोलकाता नाईट रायडर्सचा सदस्य आहे. त्याला केकेआरकडून अद्याप एकाही मॅचमध्ये संधी मिळालेली नाही.
IND vs SL : निर्णायक मॅचमध्ये धवननं टॉस जिंकला, टीम इंडियामध्ये एक बदल
केरळचा आणखी एक खेळाडू
संदीप वॉरियर हा टीम इंडियाकडून खेळणारा आणखी एक केरळचा खेळाडू आहे. केरळच्या श्रीसंतनं सुरुवातीला आंतरराष्ट्रीय कारकिर्द गाजवली. मात्र त्यानंतर तो स्पॉट फिक्सिंगमध्ये सापडला. मात्र श्रीसंतनंतर केरळमधील खेळाडूंनी क्रिकेटमध्ये प्रगती केली आहे. संजू सॅमसन (Sanju Samson) हे त्याचं प्रमुख उदाहरण. आता संजू सॅमसन नंतर संदीप वॉरियरला टीम इंडियात संधी मिळाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India Vs Sri lanka