मुंबई, 29 जुलै: श्रीलंकेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी20 मध्ये (India vs Sri Lanka) टीम इंडियाचा 4 विकेट्सनं पराभव झाला. या पराभवानंतर तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. दोन्ही टीममध्ये बुधवारी झालेला सामना चांगलाच रंगतदार झाला. त्या सामन्याच्या दरम्यान भारतीय टीमचे मुख्य कोच राहुल द्रविडनं (Rahul Dravid) एका चिठ्ठीतून मैदानात खास संदेश पाठवला होता.
द्रविडंनं श्रीलंकेच्या इनिंगमधील 18 वी ओव्हर संपल्यानंतर टीम इंडियाचा राखीव खेळाडू संदीप वॉरियरसोबत मैदानात चिठ्ठी पाठवली होती. त्यावेळी श्रीलंकेचा स्कोअर 6 आऊट 113 होता. पावसामुळे मॅचमध्ये अडथळा निर्माण झाला होता. त्यावेळी मैदानात कव्हर देखील घालण्यात आले होते. मात्र पाऊस लवकर थांबला आणि ओव्हर्स कमी न होता खेळ सुरू झाला.
काय होते कारण?
राहुल द्रविड या छोट्या ब्रेकच्या दरम्यान ड्रेसिंग रुममधून बाहेर आला. त्यानंतर त्याने संदीप वॉरियरच्या हातामध्ये चिठ्ठी दिली होती. पावसामुळे मॅच थांबली तर डकवर्थ लुईस मेथडनुसार 18 ओव्हरनंतर श्रीलंकेचा स्कोअर किती असावा याची माहिती या चिठ्ठीमध्ये देण्यात आली होती.
IND vs ENG : पहिल्या टेस्टपूर्वी विराट कोहली अडचणीत, 'त्या' पोस्टचा बसणार फटका!
18 व्या ओव्हरमध्ये आलेल्या पावसाच्या अडथळ्यानंतर लगेच खेळ सुरू झाला. धनंजय डिसिल्वाच्या (Dhananjaya De Silva) नाबाद खेळीमुळे श्रीलंकनं भारतानं दिलेलं 133 रनंचं आव्हान पार केलं. डिसिल्वाने 34 बॉलमध्ये नाबाद 40 रन केले, तर चामिका करुणारत्नेने (Chamika Karunaratne) 6 बॉलमध्ये नाबाद 12 रनची महत्त्वाची खेळी केली. याशिवाय मिनोद भानुका 31 बॉलमध्ये 36 रन करून आऊट झाला.
या विजयाबरोबरच श्रीलंकेच्या टीमने टी-20 सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी केली आहे. आता सीरिजची अखेरची मॅच गुरुवारी खेळवण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India Vs Sri lanka, Rahul dravid