Home /News /sport /

IND vs SL : श्रेयस अय्यरचा जुना Video Viral, अश्विनला सांगितली होती सर्वात मोठी इच्छा

IND vs SL : श्रेयस अय्यरचा जुना Video Viral, अश्विनला सांगितली होती सर्वात मोठी इच्छा

टीम इंडियातील मुंबईकर खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चांगलाच फॉर्मात आहे. बेंगळुरू टेस्टमधील दोन्ही इनिंगमध्ये त्याने अर्धशतक झळकावले होते. या खेळीनंतर त्याचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

  मुंबई, 16 मार्च : टीम इंडियातील मुंबईकर खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चांगलाच फॉर्मात आहे. भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील बेंगळुरूमध्ये झालेल्या टेस्टमध्ये त्याने दोन्ही इनिंगमध्ये अर्धशतक झळकावले. पहिल्या इनिंगमध्ये भारताचे अन्य सर्व खेळाडू फ्लॉप होत असताना श्रेयसनं एकाकी झुंज दिली. त्याची सेंच्युरी फक्त 8 रननं हुकली. या खेळीबद्दल 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्कार देऊनही श्रेयसचा गौरव करण्यात आला. श्रेयसला मिळालेल्या यशानंतर त्याचा आर. अश्विनसोबतचा (R. Ashwin) एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भारतीय ऑफ स्पिनर अश्विनच्या यू ट्यूब चॅनलला श्रेयसनं 2021 साली मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीमधील हा व्हिडीओ आहे. त्या व्हिडीओमध्ये श्रेयसनं त्याच्या देशांतर्गत क्रिकेटवर मोकळेपणाने चर्चा केली होती. श्रेयसनं तोपर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले नव्हते. 'मी क्रिकेट खेळणं सुरू केल्यापासून टेस्ट क्रिकेट खेळणे ही माझी सर्वात मोठी इच्छा' असल्याचं श्रेयसनं अश्विनला सांगितलं होतं.  श्रेयसच्या सध्याच्या कामगिरीनंतर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
  श्रेयस अय्यरसाठी गेले काही महिने कमालीचे यशस्वी राहिले. मागच्या वर्षाच्या शेवटी त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमधून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. कानपूरमधील पहिल्याच टेस्टमध्ये त्याने शतक आणि अर्धशतक झळकावलं, असा विक्रम करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी टीम इंडियाने खेळाडूंना आराम द्यायचं ठरवलं, तर सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाला, त्यामुळे श्रेयस अय्यरला तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगची संधी मिळाली. या संधीचा अय्यरने पुरेपूर फायदा करून घेतला. श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये अय्यरने लागोपाठ 3 अर्धशतकं केली होती. या सीरिजमध्ये अय्यरने 174.35 च्या स्ट्राईक रेटने 204 रन केले. या कामगिरीमुळे त्याला 'प्लेयर ऑफ द सीरिज' पुरस्कार  देऊनही गौरवण्यात आलं. IPL 2022 : राजस्थान रॉयल्सला स्टंटबाजी महागात, स्पर्धा सुरू होण्यापूर्वी टीम अडचणीत या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आयसीसीने फेब्रुवारी महिन्यासाठी 'आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ' (ICC Player of the Month) हा पुरस्कार देखील श्रेयसला जाहीर केला आहे. आता आगामी आयपीएल सिझनमध्ये श्रेयस कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीमची कॅप्टनसी करणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: India Vs Sri lanka, R ashwin, Shreyas iyer, Video viral

  पुढील बातम्या