Home /News /sport /

IND vs SL : गजरा आणि कानातलं घालून जडेजानं टीम इंडियात पुनरागमन, वाचा कुणी केली ही अवस्था

IND vs SL : गजरा आणि कानातलं घालून जडेजानं टीम इंडियात पुनरागमन, वाचा कुणी केली ही अवस्था

भारतीय टीमचा अनुभवी ऑल राऊंडर रविंद्र जडेजाचं (Ravindra Jadeja) टीम इंडियामध्ये पुनरागमन झालं आहे. श्रीलंका विरूद्ध उद्यापासून (गुरूवार) सुरू होणाऱ्या टी20 टीमचा तो सदस्य आहे.

    मुंबई, 23 फेब्रुवारी : भारतीय टीमचा अनुभवी ऑल राऊंडर रविंद्र जडेजाचं (Ravindra Jadeja) टीम इंडियामध्ये  पुनरागमन झालं आहे. श्रीलंका विरूद्ध उद्यापासून (गुरूवार) सुरू होणाऱ्या टी20 टीमचा तो सदस्य आहे. जडेजा दुखापतीमुळे काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर होता आता तो संपूर्ण फिट होऊन टीममध्ये परतलाय. यावेळी गजरा आणि कानातलं घातलेला जडेजाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Photo Viral) झाला आहे. टीम इंडियाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो. चहलने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर हा फोटो शेअर केला आहे.यामध्ये जडेजा वेगळ्याच लुकमध्ये दिसत आहे. हा फोटो खरा नाही. चहलनं फोटोशॉपच्या आधारे तयार केला आहे. जडेजा या फोटोत कानातलं, गजरा आणि अन्य दागिने घातेला दिसत आहे. स्वागत आहे, जड्डू पा.. असं कॅप्शन चहलनं या फोटोला दिलं आहे. त्याचबरोबर पुष्पा हा हॅशटॅग देखील वापरला आहे. यापूर्वी चहलनं अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पा या सिनेमावरील व्हिडीओ बनवला होता. या सिनेमातील ष्‍पा नाम सुनकर फ्लॉवर समझी क्‍या. फायर है मैं.’ या डायलॉगवर चहलनं हा व्हिडीओ तयार केला होता. यामध्ये चहलनं अभिनेता अल्लू अर्जुनची भूमिका केली होती. IND vs NZ : न्यूझीलंडच्या ऑल राऊंडरला डेटिंग महागात, उर्वरित सीरिजमधून आऊट रविंद्र जडेजानं शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर महिन्यात न्यूझीलंड विरूद्ध कानपूरमध्ये खेळला होता. श्रीलंका विरूद्धच्या सीरिजमध्ये विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर सूर्यकुमार यादव आणि दीपक चहर दुखापतीमुळे आऊट आहे. त्या परिस्थितीमध्ये जडेजावर मोठी जबाबदारी आहे. दुसरिकडं चहलनं वेस्ट इंडिज विरूद्धच्या सीरिजमध्ये चांगली बॉलिंग केली होती. आता श्रीलंकेविरूद्ध चहल आणि जडेजा एकत्र खेळणार आहेत.  
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: India Vs Sri lanka, Photo viral, Ravindra jadeja, Yuzvendra Chahal

    पुढील बातम्या