मुंबई, 14 जुलै: भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील वन-डे मालिका 18 जुलै रोजी सुरू होणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी श्रीलंकेचा दिग्गज बॉलर मुरलीधरनने (Muttiah Muralitharan) वरिष्ठ खेळाडूंना फटकारले आहे. माजी कॅप्टन अँजलो मॅथ्यूज, कुसल परेरा सारखे वरिष्ठ खेळाडू टीममधील तरुण खेळाडूंवर दबाव टाकत आहेत, असा दावा त्याने केला आहे.
मॅथ्यूज, परेरासह श्रीलंकेच्या वरिष्ठ टीमचा वार्षिक करारातील मुद्द्यांवर क्रिकेट बोर्डाशी वाद सुरू आहे. त्यांनी या वादामुळे करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. मुरलधीरननं या विषयावर श्रीलंकेतील मीडियाशी बोलताना सांगितले की, ' त्यांना वार्षिक कराराची आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही. आपण आता दौऱ्यावर आधारित करारपद्धती सुरू करायला हवी.'
'वार्षिक पगारात कपात केल्यानं नाराज असलेले वरिष्ठ खेळाडू तरुण खेळाडूंवर बोर्डाशी करार न करण्याबाबत दबाव टाकत आहेत. बोर्डानं प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी खेळाडूंनी तो स्वीकारला नाही. आता त्यांना वार्षिक कराराचा फायदा मिळणार नाही. त्यामुले टेस्ट क्रिकेटर्सचं सर्वाधिक नुकसान होणार आहे. त्यांना श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून मासिक वेतन मिळणार नाही. तसेच टीमला एक नोव्हेंबरपूर्वी एकही टेस्ट खेळायची नाही.' असे मुरलीधरनने स्पष्ट केले.
नव्या वेळापत्रकाची घोषणा
भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातल्या वनडे आणि टी-20 सीरिजचं नवं वेळापत्रक घोषित करण्यात आलं आहे. खरं तर ही सीरिज 13 जुलै म्हणजेच आजपासून सुरू होणार होती, पण श्रीलंका टीमचे बॅटिंग प्रशिक्षक ग्रॅण्ट फ्लॉवर (Grant Flower) आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्यामुळे सीरिज पुढे ढकलण्यात आली. आता ही सीरिज 18 जुलैपासून सुरू होणार आहे.
इंग्लंड विरुद्ध निर्णायक लढत आज, टीम इंडियाला इतिहास घडवण्याची संधी
सोमवारी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने वनडे तसंच टी-20 वेळापत्रक जाहीर केलं. या नव्या वेळापत्रकानुसार आता वनडे मॅच 2.30 ऐवजी 3 वाजता तर टी-20 मॅच रात्री 8 वाजता सुरू होणार आहेत. याआधी टी-20 चे सामने संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India Vs Sri lanka