• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs SL: पृथ्वी शॉच्या आक्रमक खेळीवर सेहवागची मजेदार प्रतिक्रिया, Tweet Viral

IND vs SL: पृथ्वी शॉच्या आक्रमक खेळीवर सेहवागची मजेदार प्रतिक्रिया, Tweet Viral

मुंबईकर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) त्याचा फॉर्म कायम राखत 24 बॉलमध्ये 9 फोरच्या मदतीनं 43 रन काढले. पृथ्वीच्या या आक्रमक खेळीवर टीम इंडियाचा माजी बॅट्समन वीरेंद्र सेहवाग (Virnender Sehwag) याने मजेदार प्रतिक्रिया दिली आहे.

 • Share this:
  मुंबई, 19 जुलै: मुंबईकर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) त्याचा फॉर्म कायम राखत 24 बॉलमध्ये 9 फोरच्या मदतीनं 43 रन काढले. या खेळीसाठी त्याला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार देखील देण्यात आला. पृथ्वीच्या या आक्रमक खेळीवर टीम इंडियाचा माजी बॅट्समन वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. पृथ्वीनं पहिल्या 5.3 ओव्हरमध्येच मॅचचं चित्र स्पष्ट केले होते.  त्याने आक्रमक सुरूवात करुन दिल्यानं टीम इंडियानं 263 रनचं आव्हान 36.4 ओव्हरमध्येच पूर्ण केले. पृथ्वी शॉच्या खेळामध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि ब्रायन लारा यांची आठवण येते, असं वक्तव्य टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी केले होते. सेहवागने रविवारी हाच मुद्दा पकडत ट्विट केलं आहे. सेहवागनं त्याचा सचिन आणि लारासह असलेला फोटो शेअर करत 'पहिल्या 5.3 ओव्हर्स आमचा जलवा होता.' असं ट्विट केलं आहे. सेहवागचं हे ट्विट चांगलंच व्हायरल (Tweet Viral) झालं आहे. श्रीलंकेने ठेवलेल्या 263 रनच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 36.4 ओव्हरमध्येच 3 विकेट गमावून केला. कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) 95 बॉलमध्ये 86 रनवर नाबाद राहिला. आपली पहिलीच वनडे मॅच खेळणाऱ्या इशान किशनने (Ishan Kishan) 42 बॉलमध्ये 59 रनची खेळी केली. सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 20 बॉलमध्ये 31 रनची नाबाद खेळी केली. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) 43 रनवर आणि मनिष पांडे (Manish Pandey) 26 रनवर आऊट झाले. शिखर धवननं केले 6 मोठे रेकॉर्ड, कोहली आणि धोनीला टाकलं मागं श्रीलंकेकडून धनंजया डि सिल्वाने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या आणि लक्षण संदकनला एक विकेट घेण्यात यश आलं. या विजयासोबतच 3 वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरी वन-डे मंगळवारी होणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published: