मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SL : आणखी 2 जण करणार पदार्पण, वाचा कशी असेल टीम इंडियाची Playing 11

IND vs SL : आणखी 2 जण करणार पदार्पण, वाचा कशी असेल टीम इंडियाची Playing 11

भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील टी20 मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे टीम इंडियाला (Team India) हा मालिका जिंकण्यासाठी गुरुवारी होणारा तिसरा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणे आवश्यक आहे.

कोलंबो, 29 जुलै : भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील टी20 मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे टीम इंडियाला (Team India) हा मालिका जिंकण्यासाठी गुरुवारी होणारा तिसरा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणे आवश्यक आहे. भारतीय टीमला दुसऱ्या सामन्यात काही चुकांचा फटका बसला. टी20 मालिका जिंकण्यासाठी या चुका टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे टीम इंडिया या सामन्यात  बदल करणार का? हा प्रश्न आहे.

श्रीलंकेविरुद्ध बुधवारी झालेल्या सामन्यात फास्ट बॉलर नवदीप सैनी (Navdeep Saini) फिल्डिंग करताना जखमी झाला. सैनी जखमी झाल्यानं तो या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर टीम इंडियाचा नवोदीत फास्ट बॉलर चेतन सकारिया (Chetan Sakruya) बुधवारच्या सामन्यात महागडा ठरला होता. सकारियानं 3.4 ओव्हर्समध्ये 34 रन दिले. त्यामुळे सकारियाच्या जागी देखील टीम मॅनेजमेंट दुसऱ्या खेळाडूला संधी देण्याची शक्यता आहे.

भारत 4 स्पिनर्ससह उतरणार?

कोलंबोच्या पिचनं स्पिन बॉलर्सना चांगली मदत केली आहे. भारतानं दुसऱ्या सामन्यात वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि राहुल चहर या तीन स्पिनर्सना खेळवलं होतं. त्या तिघांनीही चांगली कामगिरी केली. आता तिसऱ्या सामन्यात सैनीच्या जागी अतिरिक्त स्पिनर खेळवण्याचा निर्णय टीम इंडिया घेऊ शकते. तसं झालं तर तामिळनाडूचा स्पिनर आर. साई किशोर (R. Sai Kishore) तिसऱ्या सामन्यात पदार्पण करेल. साई किशोरची नेट बॉलर म्हणून श्रीलंका दौऱ्यात निवड झाली होती. टीम इंडियाला कोरोना व्हायरसचा फटका बसल्यानं त्याचा बुधवारी टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.

चेतन सकारियाच्या जागी अर्शदीप सिंगला (Arshdeep Singh) संधी मिळण्याची शक्यता आहे. पंजाब किंग्जकडून खेळणाऱ्या अर्शदीपनं आयपीएल स्पर्धेत डेथ ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याचा हा अनुभव लक्षात घेता त्यालाही शेवटच्या सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

IND vs SL: राहुल द्रविडनं मॅचच्या दरम्यान काय संदेश पाठवला? गुपित उलगडलं

टीम इंडियाची संभाव्य Playing 11 : शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन, नितीश राणा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, राहुल चहर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह आणि आर. साई किशोर

First published:
top videos

    Tags: Cricket news, India Vs Sri lanka, Team india