कोलंबो, 29 जुलै : भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्याला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियानं जिंकला होता. त्यानंतर बुधवारी झालेला दुसरा टी 20 सामना जिंकत श्रीलंकेनं बरोबरी साधली आहे. त्यामुळे दोन्ही टीमसाठी हा निर्णायक सामना जिंकणे आवश्यक आहे.
तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन शिखर धवननं (Shikhar Dhawan) टॉस जिंकला, आणि पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या सामन्यात भारतीय बॅट्समन्सना मोठी खेळी करण्यात अपयश आले होते. त्यामुळे या सामन्यात त्यांना अधिक जबाबदारीनं खेळ करणे आवश्यक आहे. या मॅचमध्ये टीम इंडियानं एक बदल केला आहे. दुसऱ्या सामन्यात नवदीप सैनी (Navdeep Saini) देखील दुखापतग्रस्त झाल्यानं हा सामना खेळणार नाही. सैनीच्या जागी संदीप वॉरियरचा (Sandeep Warrier) टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
श्रीलंका विरुद्धच्या T20 सीरिजमध्ये टीम इंडियानं पहिली मॅच जिंकली. त्यानंतर सर्व गोष्टी भारतीय टीमसाठी प्रतिकूल ठरत आहेत. दुसऱ्या टी20 पूर्वी कृणाल पांड्या कोरोना पॉझिटीव्ह आढळला. त्यामुळे त्याच्या संपर्कातले 9 खेळाडू या मालिकेतून आऊट झाले आहेत.
Hello & Good Evening from Colombo! 👋#TeamIndia have won the toss & elected to bat against Sri Lanka in the third & final #SLvIND T20I of the series.
Follow the match 👉 https://t.co/E8MEONwPlh Here's India's Playing XI 👇 pic.twitter.com/QaQL0664Z9 — BCCI (@BCCI) July 29, 2021
नवदीप सैनी हा टी20 मालिकेतून बाहेर पडलेला 10 वा खेळाडू आहे. यापूर्वी कृणाल पांड्या, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कृष्णप्पा गौतम, मनिष पांडे, इशान किशन, युजवेंद्र चहल आणि दीपक चहर हे नऊ खेळाडू या मालिकेतून आऊट झाले आहेत. कृणाल पांड्याच्या संपर्कात आल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
लज्जास्पद! क्रिकेटच्या माहेरघरात भलताच प्रकार, गद्दार खेळाडूचा टीमच्या प्रमोशनासाठी वापर
टीम इंडियाची Playing 11 : शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन, नितीश राणा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, राहुल चहर, वरुण चक्रवर्ती, चेतन सकारिया आणि संदीप वॉरियर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India Vs Sri lanka