• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • IND vs SL : टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरची पुन्हा निराशा, श्रीलंकेच्या बॉलरला दिलं Birthday Gift

IND vs SL : टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरची पुन्हा निराशा, श्रीलंकेच्या बॉलरला दिलं Birthday Gift

तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात कॅप्टन शिखर धवननं (Shikhar Dhawan) टॉस जिंकून बॅटींगचा निर्णय घेतला. मोठा स्कोअर करत श्रीलंकेवर दबाव टाकण्याची टीम इंडियाची (Team India) योजना होती. मात्र टॉप ऑर्डरनं पुन्हा एकदा निराशा केली आहे.

  • Share this:
    कोलंबो, 29 जुलै : टीम इंडियाच्या (Team India) बेंच स्ट्रेंथला श्रीलंका दौऱ्यात स्वत:ला सिद्ध करण्याची मोठी संधी होती. वन-डे सामन्यात चांगली कामगिरी केल्यानंतर टीम इंडियाच्या बॅट्समननं टी20 मालिकेत निराशा केली. सलग दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचे बॅट्समन अपयशी ठरले. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात कॅप्टन शिखर धवननं (Shikhar Dhawan) टॉस जिंकून बॅटींगचा निर्णय घेतला. मोठा स्कोअर करत श्रीलंकेवर दबाव टाकण्याची टीम इंडियाची योजना होती. मात्र धवनसह टॉप ऑर्डरला त्या योजनेनुसार खेळ करता आला नाही. शिखर धवनला भोपळा फोडण्यातही अपयश आले. धवन आऊट झाल्यानंतर आयपीएल स्पर्धा गाजवणाऱ्या ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यांना चांगली संधी होती. या जोडीला मोठी पार्टनरशिप करण्यात अपयश आले. देवदत्त पडिक्कल 9 रन काढून आऊट झाला. त्यानंतर संजू सॅमसन पुन्हा एकदा अपयशी ठरला. सॅमसनला शून्यावर हसरंगानं आऊट केलं. त्यानंतर हसरंगानं त्याच ओव्हरमध्ये ऋतुराज गायकवाडला 14 रनवर आऊट करत टीम इंडियाला चौथा धक्का दिला. हसरंगाचा (Hasaranga) आजच (गुरुवारी) 24 वा वाढदिवस आहे. हसरंगाला एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट्स देत टीम इंडियानं बर्थ-डे गिफ्ट दिले आहे. टीम इंडियाचा आणखी एक नवोदीत खेळाडू नितीश राणा (Nitish Rana) देखील या सामन्यात अपयशी ठरला. राणानं फक्त 6 रन काढले. राणा आऊट झाल्यानंतर टीम इंडियाची 9 व्या ओव्हर्समध्येच 5 आऊट 36 अशी अवस्था झाली.   या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियानं जिंकला होता. त्यानंतर बुधवारी झालेला दुसरा टी 20 सामना जिंकत श्रीलंकेनं बरोबरी साधली आहे. त्यामुळे दोन्ही टीमसाठी हा निर्णायक सामना जिंकणे आवश्यक आहे. IND vs SL: मोठ्या संघर्षानंतर मिळाली टीम इंडियात संधी, संदीप वॉरियर झाला भावुक! VIDEO या मॅचमध्ये टीम इंडियानं एक बदल केला आहे. दुसऱ्या सामन्यात नवदीप सैनी (Navdeep Saini) देखील दुखापतग्रस्त झाल्यानं संदीप वॉरियरचा (Sandeep Warrier) टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
    Published by:News18 Desk
    First published: