मुंबई, 21 जुलै: टीम इंडियानं दुसऱ्या वन-डेमध्ये श्रीलंकेचा (India vs Sri Lanka) 3 विकेट्सनं पराभव केला. श्रीलंकेनं पहिल्यांदा बॅटींग करत 50 ओव्हर्समध्ये 275 रन केले होते. शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) टीमनं हे आव्हान 5 बॉल आणि 3 विकेट्स राखून पूर्ण केलं. भारतीय क्रिकेट टीमच्या या कामगिरीवर टीम इंडियाचा नियमित कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) चांगलाच खूश झाला आहे.
विराटसह टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू इंग्लंडमध्ये आगामी टेस्ट सीरिजची तयारी करत आहेत. 4 ऑगस्टपासून ही सीरिज सुरु होणार आहे. इंग्लंडमधील टीमची प्रॅक्टीस मॅच मंगळवारी सुरू झाली. विराटनं या मॅचमधून माघार घेतली आहे. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला माघार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. इंग्लंडमधील सर्व धावपळीतही विराटचं लक्ष जगातील दुसऱ्या कोपऱ्यात सुरू असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्या वन-डे मॅचवर होते.
विराटसह टीम इंडियाचे सर्व खेळाडूंनी लॅपटॉपवर लाईव्ह मॅच पाहिली. दीपक चहरनं (Deepak Chahar) शेवटच्या बॉलवर फोर मारत टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर लगेच विराटनं ट्विट करत आनंद व्यक्त केला.
'जबरदस्त विजय. अवघड परिस्थितीमध्ये मोठे परिश्रम करत विजय खेचून आणला. मॅच पाहताना मजा आली. दीपक चहर आणि सूर्यकुमार दबावात झुंजार खेळी.' असं ट्विट विराटनं केलं आहे.
Great win by the boys. From a tough situation to pull it off was an amazing effort. Great to watch. Well done DC and Surya. Tremendous knocks under pressure. 🇮🇳
— Virat Kohli (@imVkohli) July 20, 2021
LIVE मॅचमध्ये झाली जोरदार हाणामारी, बॅटनं केली एकमेकांना मारहाण, पाहा VIDEO
सूर्यकुमार यादव आणि दीपक चहर या दोघांनीही मंगळवारी वन-डे कारकिर्दीमधील पहिलं अर्धशतक झळकावलं. सूर्यकुमारनं 53 रन कढले. तर दीपक चहरनं नाबाद 69 रनची खेळी केली. आता या मालिकेतील तिसरी आणि शेवटची वन-डे शुक्रवारी होणार आहे. ही वन-डे देखील जिंकून श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्याची संधी टीम इंडियाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.