कोलंबो, 21 जुलै: टीम इंडियाने (Team India) श्रीलंकेचा 3 विकेट्सनं पराभव करत वन-डे मालिका जिंकली आहे. टीम इंडियाला विजयासाठी 276 रनचं लक्ष्य मिळाले होते. शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) टीमनं 5 बॉल राखत हे लक्ष्य पूर्ण केले. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि दीपक चहर (Deepak Chahar) हे विजयाचे हिरो होते. या दोघांनीही वन-डे कारकिर्दीमध्ये पहिले अर्धशतक झळकावले.
या विजयानंतर सूर्यकुमार यादवनं एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये भारतीय खेळाडू विजयाचा जल्लोष करताना दिसत आहेत. हॉटेलमध्ये गाण्यांची मैफील रंगली आहे. भारतीय खेळाडूंनी गँगस्टर सिनेमातील 'न जाने कोई कैसी है ये जिंदगानी ...' हे प्रसिद्ध गाणे गायले. इशान किशन, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव हे खेळाडू यावेळी चांगलेच मस्तीच्या मूडमध्ये होते.
View this post on Instagram
भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये श्रीलंकेने पहिल्यांदा बॅटींग करत 50 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 275 रन केले. आविष्का फर्नांडो (Avishka Fernando) आणि मिनोद भानुका (Minod Bhanuka) यांनी श्रीलंकेला पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून दिली. 77 रनवर श्रीलंकेची पहिली विकेट गेली. मागच्या सामन्याप्रमाणेच या सामन्यातही श्रीलंकेच्या बॅट्समनना चांगली सुरुवात मिळाली, पण त्यांना मोठा स्कोअर करता आला नाही.
T20 वर्ल्ड कपपूर्वी इंग्लंडचा इशारा! श्रीलंकेनंतर पाकिस्तानचा केला पराभव
श्रीलंकेच्या 276 रनचा पाठलाग करताना भारताची अवस्था 7 आऊट 193 झाली होती. त्यावेळी दीपक चहर (Deepak Chahar) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) या दोन प्रमुख बॉलर्सनी आठव्या विकेट्ससाठी 84 रनची नाबाद भागिदारी करत विजय खेचून आणला. चहरनं 69 रन तर भुवनेश्वरनं 19 रन काढले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India Vs Sri lanka, Instagram