मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SL : रविंद्र जडेजाची डबल सेंच्युरी रोखली, द्रविड पुन्हा एकदा त्याच वादात सापडला

IND vs SL : रविंद्र जडेजाची डबल सेंच्युरी रोखली, द्रविड पुन्हा एकदा त्याच वादात सापडला

भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात मोहालीमध्ये टेस्ट मॅच सुरू आहे. या टेस्टमध्ये टीम इंडियानं पहिली इनिंग घोषित करण्याचा निर्णय वादात सापडला आहे.

भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात मोहालीमध्ये टेस्ट मॅच सुरू आहे. या टेस्टमध्ये टीम इंडियानं पहिली इनिंग घोषित करण्याचा निर्णय वादात सापडला आहे.

भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात मोहालीमध्ये टेस्ट मॅच सुरू आहे. या टेस्टमध्ये टीम इंडियानं पहिली इनिंग घोषित करण्याचा निर्णय वादात सापडला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 5 मार्च : भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात मोहालीमध्ये टेस्ट मॅच सुरू आहे. या टेस्टमध्ये टीम इंडियानं पहिली इनिंग घोषित करण्याचा निर्णय वादात सापडला आहे. कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) पहिली इनिंग 8 आऊट 574 रनवर घोषित केली. रोहितनं इनिंग घोषित करण्याचा निर्णय घेतला तेव्हा क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का बसला. कारण, त्यावेळी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) 175 रनवर खेळत होता. जडेजा सहज डबल सेंच्युरी करेल असं वाटत होतं. त्याचवेळी रोहितनं इनिंग घोषित केली.

रोहित शर्मानं इनिंग घोषित केली असली तरी या घटनेनंतर हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) वादात सापडला आहे.  कायमच वादांपासून लांब राहिलेला राहुल द्रविड इनिंग घोषित करण्याबाबत वादात सापडण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वीच्या घटनांमध्येएक वाद तो उपकर्णधार असताना, दुसरा कॅप्टन असताना आणि आता तिसरा वाद कोच असताना झाला आहे. यातल्या एकदाच भारताने टेस्ट मॅच जिंकली. सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आपल्या आत्मचरित्रामध्ये राहुल द्रविडच्या इनिंग घोषित करण्याच्या निर्णयावर सविस्तर लिहिलं आहे.

भारत विरूद्ध न्यूझीलंड (Indai vs New Zealand) यांच्यात  कानपूरमध्ये मागील वर्षी झालेल्या टेस्टमध्ये भारताने अखरेच्या दिवशी 98 ओव्हर बॉलिंग केली, यादरम्यान भारताने किवी टीमच्या 9 विकेट घेतल्या, पण अखेरची जोडी तोडण्यात त्यांना अपयश आलं. मॅचदरम्यान स्टार स्पोर्ट्सवर कॉमेंट्री करणाऱ्या व्हीव्हीएस लक्ष्मण, इरफान पठाण आणि आकाश चोप्रा या तिघांनी भारताने इनिंग घोषित करण्यासाठी उशीर केल्याचं मान्य केलं. विराट कोहली कॅप्टन असता तर त्याने आधीच डाव घोषित केला असता, ज्यामुळे बॉलरना न्यूझीलंडचा ऑल आऊट करण्यासाठी वेळ मिळाला असता, असं मत इरफान पठाणने मांडलं.

IND vs SL : विराट कोहलीला टीम इंडियानं दिली खास मानवंदना, पाहा VIDEO

सचिन 194 वर असताना इनिंग घोषित

भारतीय क्रिकेटमधला इनिंग घोषित करण्याचा सगळ्यात मोठा वाद 2004 साली झाला होता, तेव्हा राहुल द्रविड कॅप्टन होता. पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) या सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताने डाव घोषित केला तेव्हा सचिन तेंडुलकर नाबाद 194 रनवर खेळत होता. द्विशतकाजवळ असताना इनिंग घोषित केल्यामुळे सचिनने तेव्हाही नाराजी व्यक्त केली होती. सचिनने त्याचं आत्मचरित्र प्लेयिंग इट माय वे मध्ये याबाबत लिहिलं आहे.

टी  ब्रेकवेळी ड्रेसिंग रूममध्ये मी इनिंग घोषित करण्याबाबत विचारलं तेव्हा मला दिवसाच्या 15 ओव्हर शिल्लक असताना इनिंग घोषित केली जाईल, असं सांगितलं गेलं, पण फक्त अर्ध्या तासानंतरच मला जलद खेळण्याचा संदेश देण्यात आला. काही वेळानंतर पुन्हा मेसेज आला तेव्हा याच ओव्हरमध्ये द्विशतक पूर्ण कर, कारण द्रविड इनिंग घोषित करणार आहे, असं सांगण्यात आलं. त्यावेळी आमच्याकडे 12 बॉल शिल्लक होते, पण त्या ओव्हरमध्ये मला बॅटिंगच आली नाही.

इमरान फरहातच्या बॉलिंगवर युवराज आऊट झाला. आणि पार्थिव पटेल बॅटिंगला आला तेव्हा द्रविडने आम्हाला ड्रेसिंग रूममध्ये बोलावलं. यानंतर मला धक्का बसला कारण ड्रेसिंग रूममध्ये झालेल्या चर्चेप्रमाणे मला कमीत कमी एक ओव्हर तरी बॅटिंग मिळायला पाहिजे होती, पण तसं झालं नाही,' असं सचिन त्याच्या आत्मचरित्रात म्हणाला.

IND vs SL: जडेजाची मोहालीमध्ये तलवारबाजी, श्रीलंकेविरूद्ध झळकावली दमदार सेंच्युरी! VIDEO

शतकाजवळ असलेला द्रविड बॅटिंगसाठी उत्सुक

द्रविड आणि इनिंग घोषित करण्याचा वाद 2004 साली आणखी एकदा झाला होता. सिडनी टेस्टमध्ये (India vs Australia) सचिन तेंडुलकरने 241 रनची खेळी केली होती. भारताने या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 7 विकेट गमावून 705 रन केले होते. यानंतर ऑस्ट्रेलियाचा 474 रनवर ऑल आऊटझाला, ज्यामुळे भारताला 231 रनची आघाडी मिळाली. यानंतर भारताने आपली दुसरी इनिंग 211/2 वर घोषित केली, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 443 रनचं आव्हान मिळालं.

या सामन्यात भारताने इनिंग लवकर घोषित केली असती, तर भारताच्या बॉलरना मॅच जिंकवून देण्याची संधी मिळाली असती, असं सचिन तेंडुलकरने त्याच्या पुस्तकात लिहिलं आहे.  मी आणि राहुल चांगली पार्टनरशीप करत होतो, तेव्हा कॅप्टन असलेल्या सौरव गांगुलीने दोन-तीन संदेश पाठवले आणि इनिंग कधी घोषित करायची, असं विचारलं. राहुल टीमचा व्हाईस कॅप्टन होता, त्यामुळे हा निर्णय त्या दोघांचा असेल, असं मी सांगितलं. राहुल द्रविडला आणखी काही वेळ खेळण्यासाठी उत्सुक होता. ब्रेट लीचा बाऊन्सर द्रविडच्या डोक्याला लागल्यानंतर आम्ही इनिंग घोषित केली. तेव्हा द्रविड 91 रनवर आणि मी 60 रनवर खेळत होतो. ती मॅच आठवली की आम्ही आधीच इनिंग घोषित करायला पाहिजे होती,' असं सचिन म्हणाला.

First published:

Tags: Cricket, India Vs Sri lanka, Rahul dravid, Ravindra jadeja