मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SL: नव्या टीम इंडियाची आज पहिली परीक्षा, वाचा कसं आहे आजचं हवामान

IND vs SL: नव्या टीम इंडियाची आज पहिली परीक्षा, वाचा कसं आहे आजचं हवामान

शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखालील टीम इंडियाची पहिली परीक्षा रविवारी होणार आहे. कोलंबोतील आर. प्रेमादास स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीकडं भारतीय फॅन्सचं लक्ष लागलं आहे.

  • Published by:  News18 Desk

कोलंबो, 18 जुलै: शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखालील टीम इंडियाची पहिली परीक्षा रविवारी होणार आहे. कोलंबोतील आर. प्रेमादासा स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीकडं भारतीय फॅन्सचं लक्ष लागलं आहे. मात्र या लढतीवर पावसाचं सावट आहे. रविवारी पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. पावसामुळे हवेत दमटपणा देखील जास्त असेल. त्याचा खेळाडूंना सामना करावा लागेल.

भारत विरुद्ध श्रीलंका लढतीमधील टॉस या हवामानामुळे अधिक महत्त्वपूर्ण होणार आहे. टॉस जिंकणारा कॅप्टन पहिल्यांदा फिल्डिंग घेण्याची शक्यता आहे. या दोन टीमच्या सामन्यांचा इतिहास पाहिला तर टीम इंडियाचं पारडं जड आहे. गेल्या वर्षी झालेल्या सामन्यांमध्ये श्रीलंकेला फक्त एक विजय मिळाला आहे. तर भारताने तीन सामने जिंकले आहेत.

धवनला रेकॉर्डची संधी

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शिखर धवनला नवीन रेकॉर्ड करण्याची संधी आहे. धवनने हे रेकॉर्ड केलं तर तो सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) मागे टाकेल.धवनने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 5,977 रन केले आहे. या सामन्यात जर त्याला 27 रन करता आल्या तर त्याच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये 6 हजार रन होतील. हा रेकॉर्ड करणारा धवन 10 वा भारतीय खेळाडू होईल.

HBD Smriti Mandhana: भावाला पाहून सुरू केले क्रिकेट, 17 व्या वर्षीच रचला सर्वात मोठा इतिहास

याशिवाय धवनकडे सौरव गांगुलीचा विक्रम मोडण्याचीही संधी आहे. शिखर धवन भारताकडून सगळ्यात जलद 6 हजार रन पूर्ण करणारा दुसरा खेळाडू ठरू शकतो. विराट कोहलीने 136 इनिंगमध्ये 6 हजार रन पूर्ण केले होते. तो या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. 6 वर्ष 83 दिवसानंतर विराटला 6 हजार रन करता आले होते. विराटनेही श्रीलंकेविरुद्धच 2014 साली हैदराबादमध्ये 6 हजार रनचा टप्पा ओलांडला होता. सध्या या यादीमध्ये सौरव गांगुली दुसऱ्या क्रमांकावर आहे. गांगुलीने 147 इनिंगमध्ये 6 हजार रन पूर्ण केले. यासाठी गांगुलीला 8 वर्ष 289 दिवसांचा वेळ लागला.

First published:

Tags: Cricket news, India Vs Sri lanka