कोलंबो, 18 जुलै: भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील वन-डे मालिकेत अनेक तरुण खेळाडू टीम इंडियाकडून खेळणार आहेत. टीम इंडियाचे दिग्गज सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहेत. त्यामुळे भारतीय फॅन्सना युवा जोश पाहण्याची संधी या दौऱ्यात आहे. या तरुण खेळाडूंपैकी पृथ्वी शॉवर (Prithvi Shaw) सर्वाधिक लक्ष असेल. पृथ्वी आक्रमक बॅटींगसाठी ओळखला जातो. श्रीलंका दौऱ्यात त्याला गुणवत्ता दाखवण्याची पूर्ण संधी आहे.
टी20 वर्ल्ड कप लक्ष्य
यूएई आणि ओमानमध्ये होणारा टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळणे हे पृथ्वी शॉचे मुख्य लक्ष्य आहे. या टीममध्ये जागा मिळवण्यासाठी त्याला या दौऱ्यात मोठी खेळी करणे आवश्यक आहे. पृथ्वी शॉ 50 ओव्हर्सच्या क्रिकेटमधील एक यशस्वी बॅट्समन आहे. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या या प्रकारच्या स्पर्धेत पृथ्वीनं फक्त 8 मॅचमध्ये 827 रन केले होते. यामध्ये एका द्विशतकाचाही समावेश होता.
पाच महिन्यांपूर्वी झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) पृथ्वी शॉने वादळी बॅटींग केली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब कामगिरीमुळे पृथ्वीला टीममधून वगळण्यात आले होते. त्यावेळी पृथ्वीने विजय हजारे ट्रॉफीत जबरदस्त खेळ करत मुंबईला विजेतेपद मिळवून दिले. पृथ्वी त्या स्पर्धेत 8 सामन्यांमध्ये 165.40 च्या सरासरीने 827 रन केले होते. हा एक रेकॉर्ड आहे. त्याने पुदुच्चेरी विरुद्ध नाबाद 227 रनची खेळी केली होती. पृथ्वीने विजय हजारे स्पर्धेत एकूण 25 सिक्स आणि 105 फोर लगावले होते.
IND vs SL : कोहली-शास्त्रीचं ‘खास मिशन’ शिखर धवन करणार पूर्ण
श्रीलंकेविरुद्ध द्विशतक करणार?
पृथ्वी शॉचा फॉर्म पाहता त्याच्याकडून श्रीलंकेविरुद्ध द्विशतक करण्याची अपेक्षा करता येऊ शकते. श्रीलंकेचा बॅटींग अटॅक जास्त अनुभवी नाही. तसेच कोलंबोचे पिच हे बॅटींगला मदत करणारे आहे. पृथ्वी शॉ पहिल्या 10 ओव्हर टिकला तर नंतर बॉलर्सची डोकेदुखी वाढू शकते. श्रीलंकेविरुद्ध यापूर्वी रोहित शर्मा (Rohit Sharma) या मुंबईकरने वन-डे क्रिकेटमध्ये द्विशतक केलं आहे. रोहितची बरोबरी करण्याची संधी पृथ्वीला या मालिकेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, India Vs Sri lanka, Prithvi Shaw, Rohit sharma, Sports