मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA Weather Forecast: टीम इंडियाच्या विजयातील सर्वात मोठा अडथळा, वाचा कसं आहे आजचं हवामान

IND vs SA Weather Forecast: टीम इंडियाच्या विजयातील सर्वात मोठा अडथळा, वाचा कसं आहे आजचं हवामान

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात सेंच्युरियनमध्ये सुरू असलेल्या पहिल्या टेस्टचा आज (गुरुवार) शेवटचा दिवस आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 30 डिसेंबर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात सेंच्युरियनमध्ये सुरू असलेल्या पहिल्या टेस्टचा आज (गुरूवार) शेवटचा दिवस आहे. या मॅचमध्ये टीम इंडिया विजयाच्या मार्गावर आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेनं 305 रनचा पाठलाग करताना 4 आऊट 94 रन केले होते. आफ्रिकेला विजयासाठी आणखी 211 रनची आवश्यकता आहे. तर टीम इंडियाला 6 विकेट्सची गरज आहे.

टीम  इंडियाच्या विजयात सर्वात मोठा अडथळा हवामानाचा आहे. सेंच्युरियन टेस्टचा दुसरा दिवस पावसामुळे वाया गेला. आता पाचव्या आणि शेवटच्या दिवशी देखील दोन तास पाऊस पडेल असा अंदाज एक्यूवेदरनं व्यक्त केला आहे. गुरुवारी 28 डिग्री सेल्सियस तापमान राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मैदानावर काळे ढग देखील असतील.

सेंच्युरियन टेस्टमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी फास्ट बॉलर्सनी वर्चस्व गाजवलं आहे. टीम इंडियाचे 4 फास्ट बॉलर्स शेवटच्या दिवशी यजमान टीमची परीक्षा घेण्यासाठी सज्ज असतील. पण आफ्रिकेची पराभवातून वाचण्यासाठी पावसावर मोठी भिस्त आहे. सेंच्युरियनमध्ये टीम इंडियानं आजवर एकदाही टेस्ट मॅच जिंकलेली नाही. गुरुवारी हा रेकॉर्ड बदलण्याची संधी टीम इंडियाला आहे.

भारताने दिलेल्या 305 रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात दुसऱ्या इनिंगमध्येही खराब झाली. एडन मार्करम एक रन करूनच आऊट झाला. तर कीगन पीटरसन 17 आणि रस्सी व्हॅन डर डुसेन 11 रन करून माघारी परतला. नाईट वॉचमन म्हणून बॅटिंगला आलेला केशव महाराज आऊट झाल्यानंतर दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.

IND vs SA : पाकिस्तानसह 6 देशांना जमलं नाही ते टीम इंडिया आज करणार!

भारताकडून जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) 2 तर मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन डीन एल्गार 52 रनवर नाबाद खेळत आहे. भारतीय बॉलर्सना पाचव्या दिवशी एल्गारचा अडथळा लवकर दूर करणे देखील आवश्यक आहे.

First published:

Tags: South africa, Team india, Weather forecast