मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : रोहित शर्मानं केला मोठा रेकॉर्ड, धोनीला मागे टाकून बनला नंबर 1

IND vs SA : रोहित शर्मानं केला मोठा रेकॉर्ड, धोनीला मागे टाकून बनला नंबर 1

महेंद्रसिंह धोनीला मागं टाकत रोहित शर्मा नंबर 1 बनलाय. (संग्रहित फोटो)

महेंद्रसिंह धोनीला मागं टाकत रोहित शर्मा नंबर 1 बनलाय. (संग्रहित फोटो)

भारतीय क्रिकेट टीमचा सध्याचा कॅप्टन रोहित शर्माने धोनीचा एक विक्रम नुकताच तोडलाय. धोनीला मागे टाकून रोहित नंबर 1 बनला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 30 सप्टेंबर : भारतीय क्रिकेटमधील सर्वांत यशस्वी कॅप्टन कोण आहे, असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना विचारला, तर अनेकांचे उत्तर महेंद्रसिंग धोनी असं येतं. धोनीचे असे अनेक विक्रम आहेत, जे तोडणं कोणत्याही खेळाडूसाठी सोपं नाही. पण भारतीय क्रिकेट टीमचा सध्याचा कॅप्टन रोहित शर्माने धोनीचा एक विक्रम नुकताच तोडलाय. रोहितने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा सर्वांत यशस्वी कॅप्टन बनण्याचा मान मिळवला आहे. या पूर्वी हा विक्रम माजी कॅप्टन एमएस धोनीच्या नावावर होता. याबाबत ‘झी न्यूज हिंदी’ने वृत्त दिलंय.

भारतीय टीम सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 सीरीज खेळत आहे. या सीरीजमधील 28 सप्टेंबर 2022 रोजी झालेली पहिली मॅच भारताने जिंकली. या मॅचमध्ये भारतीय खेळाडूंनी बॉलिंग आणि बॅटिंग या दोन्हीमध्ये उत्तम खेळ दाखवला, व सीरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. तर, ही सीरिज सुरू होण्यापूर्वी झालेली ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 सीरिजसुद्धा भारताने जिंकली. ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही सीरिज जिंकतानाच रोहित शर्माने एक मोठा विक्रम केला आहे. तो घरच्या मैदानावर भारताचा सर्वांत यशस्वी कॅप्टन झाला आहे.

धोनीचा विक्रम मोडला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने पराभव केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2022 मध्ये घरच्या मैदानावर टी-20 क्रिकेटमध्ये मिळवलेला 16 वा विजय होता. यासह तो घरच्या मैदानावर एका वर्षात सर्वाधिक मॅच जिंकणारा कॅप्टन बनला. या पूर्वी हा विक्रम धोनीच्या नावावर होता. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2016 मध्ये घरच्या मैदानांवर झालेल्या 15 टी-20 मॅचेस जिंकल्या होत्या.

सेहवाग ते बुमराह... प्रत्येक वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला बसला आहे धक्का

भारताचा भरवशाचा खेळाडू

रोहित शर्माने भारतीय टीमसाठी अनेक मॅच स्वबळावर जिंकून दिल्यात. तो टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे. त्याने टी-20 मध्ये भारतासाठी 138 मॅचमध्ये एकूण 3677 रन्स केलेत. 233 वनडेत 9376 रन्स केल्या आहेत. त्याचबरोबर टेस्ट क्रिकेटमध्ये 3137 रन्स केल्यात. तिन्ही फॉरमॅटमध्ये तो भारतासाठी अत्यंत भरवशाचा बॅटर आहे.

रोहित शर्मा त्याच्या स्फोटक बॅटिंगसाठी प्रसिद्ध आहे. जगातील सर्वोत्कृष्ट ओपनर्समध्ये त्याची गणना होते. जेव्हा तो लयीत असतो, तेव्हा तो कोणत्याही बॉलरचे आक्रमण मोडून काढू शकतो. तो कॅप्टन म्हणूनही उत्कृष्ट कामगिरी करत आहे. धोनीच्या नावावर असणारा विक्रम मोडून त्याने ते पुन्हा एकदा स्वत: ला सिद्ध केलंय.

First published:

Tags: Cricket news, MS Dhoni, Rohit sharma