IND vs SA: ...तेव्हा रवी शास्त्री घेत होते 10 कोटींची झोप!

IND vs SA: ...तेव्हा रवी शास्त्री घेत होते 10 कोटींची झोप!

शास्त्री यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

  • Share this:

रांची, 22 ऑक्टोबर: कर्णधार विराट कोहली(Virat Kohli)च्या नेतृत्वाखाली भारतीय संघा (Team India)ने दक्षिण आफ्रिके(South Africa)ला क्लीन स्वीप दिला. रांचीत झालेल्या तिसरा कसोटी सामना भारतीय संघाने एक डाव 202 धावांनी जिंकला. या विजयासह भारतीय संघाने मालिका 3-0 अशी जिंकली. भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल सर्व क्रिकेटपटू आणि चाहते खुश झाले आहेत. संघाच्या या कामगिरीवर प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri)फारच उत्साही झाले आहेत. भारताच्या या विजयानंतर शास्त्रींनी तर इतक सांगून टाकले की, भारतीय संघासाठी खेळपट्टी हा मुद्दाच नसतो. जगातील सर्व ठिकाणी आम्ही विजय मिळवू शकतो. अर्थात या पाठोपाठ शास्त्री यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोवरून नेटिझन्सनी मीम्स देखील तयार केले आहेत.

व्हायरल फोटोमध्ये शास्त्री ड्रेसिंग रुममध्ये झोपत असल्याचे दिसत आहेत. शास्त्रीचा झोपत असतानाचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि तो व्हायरल होऊ लागला. शास्त्रीचा हा फोटो व्हायरल करताना काही नेटिझन्सनी ते 10 कोटी रुपये झोपण्यासाठी घेतात असा टोला लगावला. शास्त्रींना त्यांच्या कामासाठी जवळपास 10 कोटी रुपये मिळतात. त्यामुळे नेटिझन्सनी त्यांच्यावर मीम्स तयार केले आहेत. अर्थात ट्रोलर्सच्या निशाण्य़ावर येण्याची रवी शास्त्री यांची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील ते अनेक वेळा ट्रोल झाले आहेत. वेस्ट इंडिज दौऱ्यात देखील ते अशाच प्रकारे ट्रोल झाले होते.

भारतीय संघाने रांची कसोटी सामन्यात अनेक विक्रम स्वत:च्या नावावर केले. पहिल्या डावात भारतीय संघाने 497 धावांचा डोंगर उभा केला. त्याला उत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिकेचा पहिला डाव 162 धावांवर संपुष्ठात आला. त्यानंतर भारतीय संघाने फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात आफ्रिका 133वरच बाद झाली. या सामन्यात रोहित शर्माने द्विशतकी खेळी केली. तर अजिंक्य रहाणे याने 155 धावांची खेळी केली. द्विशतक करणाऱ्या रोहितला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 08:46 PM IST

ताज्या बातम्या