मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA : मोहम्मद सिराजचा मोठं रेकॉर्ड, शमी-बुमराहला टाकलं मागं

IND vs SA : मोहम्मद सिराजचा मोठं रेकॉर्ड, शमी-बुमराहला टाकलं मागं

टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराजसाठी (Mohammed Siraj) 2021 हे जोरदार वर्ष ठरलं आहे. त्यानं या वर्षात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) या दिग्गज बॉलर्सना मागे टाकलं आहे.

मुंबई, 30 डिसेंबर : टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराजसाठी  (Mohammed Siraj) 2021 हे जोरदार वर्ष ठरलं आहे. तो सध्या दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध (India vs South Africa) पहिली टेस्ट खेळत आहे. या टेस्टमध्ये टीम इंडियानं आफ्रिकेसमोर विजयासाठी 305 रनचं टार्गेट ठेवलं आहे. त्याला उत्तर देताना यजमान टीमनं चौथ्या दिवसाच्या अखेर 4 आऊट 94 रन केले आहेत. भारतीय टीमनं आजवर एकदाही सेंच्युरियनमध्ये टेस्ट मॅच जिंकलेली नाही. यंदा हा इतिहास रचण्याची टीम इंडियाला संधी आहे.

सिराजनं दुसऱ्या इनिंगमध्ये कीगन पीटरसनला आऊट केले. पीटरसननं 36 बॉलमध्ये 17 रन काढले. ही सिराजची या वर्षातील 30 वी टेस्ट विकेट आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) या दिग्गज बॉलर्सनाही या वर्षात हा टप्पा गाठता आलेला नाही.

मोहम्मद सिराज हा टीम इंडियाकडून यावर्षाी सर्वात जास्त विकेट्स घेणारा फास्ट बॉलर बनला आहे. त्याने आत्तापर्यंत 10 टेस्ट आणि 19 इनिंगमध्ये 30 च्या सरासरीनं 30 विकेट्स घेतल्या आहेत. 73 रन देऊन 5 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. बुमराहनं 9 टेस्टमधील 16 इनिंगमध्ये 29 तर शमीनं 5 टेस्टमधील 9 इनिंगमध्ये 21 विकेट्स घेतल्या आहेत.

न्यूझीलंडच्या दिग्गज क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा, 16 वर्षांच्या कारकिर्दीला करणार अलविदा

भारतीय बॉलर्सकडून या वर्षात सर्वात जास्त विकेट्स ऑफ स्पिनर आर. अश्विननं (R. Ashwin) घेतल्या आहेत. त्याने 9 टेस्टमधील 17 इनिंगमध्ये 52 विकेट्स घेतल्या आहेत. अन्य कोणत्याही बॉलरनं 50 विकेट्सचा टप्पा ओलांडलेला नाही. डावखुरा स्पिनर अक्षर पटेल 5 टेस्टमधील 10 इनिंगमध्ये 36 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर सिराज सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय बॉलर्सच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

First published:

Tags: Cricket news, Team india