Home /News /sport /

IND vs SA : राहुल द्रविडच्या एका सल्ल्यामुळे वाचलं करिअर, आता गाजवणार दक्षिण आफ्रिका दौरा

IND vs SA : राहुल द्रविडच्या एका सल्ल्यामुळे वाचलं करिअर, आता गाजवणार दक्षिण आफ्रिका दौरा

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिली टेस्ट 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. न्यूझीलंड विरुद्धची सीरिज (India vs New Zeland) गाजवणारा टीम इंडियाचा खेळाडू हा दौरा गाजवण्यासाठी देखील सज्ज झाला आहे.

    मुंबई, 11 डिसेंबर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिली टेस्ट 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या सीरिजसाठी टीम इंडिया लवकरच आफ्रिकेला रवाना होईल. भारतीय टीमनं आजवर आफ्रिकेत एकही टेस्ट सीरिज जिंकलेली नाही. यंदा हा इतिहास बदलण्याची टीम इंडियाला संधी आहे. राहुल द्रविड (Rahul Dravid) हेड कोच झाल्यानंतर भारतीय क्रिकेट टीमचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. टीम इंडियाच्या या दौऱ्यात ओपनर मयंक अग्रवालचा (Mayank Agarwal) समावेश केला आहे. त्याला अंतिम 11 मध्ये  ओपनर म्हणून जागा मिळणे अवघड आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएस राहुल (KL Rahul) या दोन दिग्गजांशी त्याची या जागेसाठी स्पर्धा आहे. त्यामुळे मयंकने आता कोणत्याही नंबरवर खेळण्याची तयारी सुरू केली आहे. मयंकने न्यूझीलंड विरुद्धच्या मुंबई टेस्टमध्ये 150 रनची दनदार खेळी केली होती. हे शतक झळकावण्यापूर्वी त्याचा फॉर्म घसरला होता. त्याला मागील दोन वर्षात टेस्ट क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आले नव्हते. पहिल्या टेस्टपूर्वी मयकने त्याच्या बॅटींगबाबत हेड कोच राहुल द्रविडशी सविस्तर चर्चा केली. द्रविडने यावेळी दिलेल्या एका सल्ल्यामुळे मयंकच्या क्रिकेट करिअरला जीवदान मिळाले आहे. मयंकमे मुंबई टेस्टमधील कामगिरीचं श्रेय द्रविडला दिले आहे. मयंकने 'स्पोर्ट्सकीडा' शी बोलताना राहुल द्रविडशी काय चर्चा केली याचा खुलासा केला आहे. 'मी जास्त रन केले नाहीत हे त्यांना माहिती होते. त्यांनी मला भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा आणि मनातील विचार मॅनेज करण्याचा सल्ला दिला. द्रविडने माझी मानसिक अवस्था समजून त्या पातळीवर मला मजबूत करण्यावर भर दिला. मी त्यांना बॅटींगमधील तंत्राबाबतही विचारले. त्यावेळी तू यापूर्वी याच तंत्राच्या जोरावर भरपूर रन केले आहेस. तसाच खेळ पुढे कर. रन नक्की होतील. ज्या गोष्टी केल्यानं यापूर्वी तुझी कामगिरी चांगली झाली, त्या गोष्टी पुन्हा एकदा कर,' असा सल्ला द्रविडने दिल्याचा खुलासा मयंकने केला. Ashes Test: मैदानात कमावलं पण आयोजनात गमावलं, ऑस्ट्रेलियाची गेली जगासमोर लाज! मयंकने मुंबई टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये 150 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 62 रन काढले. त्याच्या या खेळीच्या जोरावरच एजाज पटेलनं एका इनिंगमध्ये सर्व 10 विकेट्स घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतरही टीम इंडियानं मुंबई टेस्ट 372 रनने दणदणीत जिंकली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Rahul dravid, South africa, Team india

    पुढील बातम्या