भारताचा विराट विजय, दक्षिण आफ्रिकेला एक डाव आणि 137 धावांनी चारली धूळ

भारताचा विराट विजय, दक्षिण आफ्रिकेला एक डाव आणि 137 धावांनी चारली धूळ

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दुसरा सामना जिंकून भारताने विजयी आघाडी घेतली.

  • Share this:

पुणे, 13 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसऱा कसोटी सामना भारताने एक डाव आणि 137 धावांनी जिंकून मालिकासुद्धा 2-0 ने खिशात घातली. भारताने पहिल्या डावात 601 धावा केल्या होत्या. त्यानंतर आफ्रिकेला 275 धावांवर बाद करत फॉलोऑन दिला. दुसरा डाव 189 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून दुसऱ्या डावात जडेजा आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. तर अश्विनने दोन आणि शमी, इशांत शर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

तत्पूर्वी भारताकडून गोलंदाजीत पहिल्या डावात अश्विननं सर्वात जास्त 4 विकेट घेतल्या. विराट आणि मयंकनं तुफानी फलंदाजी केल्यानंतर आफ्रिकेचे फलंदाज अश्विनच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले. तरी, गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केशव महाराजनं दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. केशवच्या 72 धावांच्या खेळीमुळं आफ्रिकेनं 275 धावांपर्यंत मजल मारली. तिसऱ्या दिवसाच्या शेवटी भारतानं चांगली गोलंदाजी करत 275 धावांवर बाद केले.

दरम्यान, दुसऱ्य़ा दिवशी 36 धावांवर तीन विकेट गमावलेल्या आफ्रिकेला चांगली सुरुवात करता आली नाही. मात्र कर्णधार फाफ ड्युप्लेसिसनं आफ्रिकेचा डाव सावरण्याच प्रयत्न केला. ड्यु प्लेसिस णि क्विंटन डी कॉक यांच्या अर्धशतकी भागिदारीनं आफ्रिकेला सावरले. त्यानंतर डी कॉकला 31 धावांवर अश्विननं माघारी धाडले. अष्टपैलु मुथुस्वामीलाही चांगली कामगिरी करता आली नाही. जडेजानं त्याला बाद केले. त्यानंतर कर्णधार ड्युप्लेसिसला अश्विननं माघारी धाडले.

केशव महाराज आणि फिलेंडर यांनी चांगली खेळी करत डाव सांभळला. अखेर केशवला अश्विननं 72 धावांवर बाद केले. तिसऱ्या दिवशी भारताकडून अश्विननं 4, उमेश यादव 3, शमीनं 2 तर जडेजानं एक विकेट घेतली.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेत पहिल्यांदाच कोणत्याही भारतीय कर्णधाराने पाहुण्या संघाला फॉलोऑन दिला आहे. विराट दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन देणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. भारताला सर्वाधिक कसोटी जिंकून देणाऱ्या मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, महेंद्र सिंग धोनी या कर्णधारांनाही अशी कामगिरी करता आली नव्हती. गेल्या दहा वर्षात आफ्रिकेला कोणत्याही संघाने फॉलोऑन दिला नव्हता.

मुख्यमंत्र्यांचा मुंबईकरांसोबत मॉर्निंग वॉक, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2019 03:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading