मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : सेंच्युरियन टेस्टपूर्वी द्रविडने घेतला विराटचा क्लास, पाहा VIDEO

IND vs SA : सेंच्युरियन टेस्टपूर्वी द्रविडने घेतला विराटचा क्लास, पाहा VIDEO

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिली टेस्ट 26 डिसेंबरपासून सेंच्युरीयनमध्ये होणार आहे. या टेस्टमध्ये सर्व फोकस हा टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीच्या (Virat Kohli) खेळावर असेल.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 19 डिसेंबर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिली टेस्ट 26 डिसेंबरपासून सेंच्युरीयनमध्ये सुरू होणार आहे. टीम इंडियानं आजवर दक्षिण आफ्रिकेत एकही टेस्ट सीरिज जिंकलेली नाही. हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा हा इतिहास बदलण्याचा पूर्ण प्रयत्न असेल. त्यामुळे आफ्रिकेत दाखल होताच द्रविड कामाला लागला आहे. द्रविडचा सर्व फोकस हा कॅप्टन विराट कोहलीवर (Virat Kohli) आहे. विराट टीम इंडियातील सर्वात मेन बॅटर आहे. त्याने 2018 साली या स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्ये 153 रनची खेळी केली होती. विराटच्या शतकानंतरही टीम इंडियानं ती टेस्ट गमावली होती. आता विराटला त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.

राहुल द्रविडने टीम इंडियाच्या पहिल्याच नेट सेशनमध्ये विराटचा क्लास घेतला. या सेशनचा व्हिडीओ बीसीसीआयनं शेअर केला आहे. यामध्ये विराट नेट प्रॅक्टीस करत असून त्याला द्रविड टिप्स देत आहे. विराटही द्रविडचा सल्ला लक्षपूर्वक ऐकत आहे. या व्हिडीओमध्ये चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत देखील बॅटींगचा सराव करताना दिसत आहेत.

दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक रन

टीम इंडियाच्या मागील दौऱ्यात विराटनं भारताकडून सर्वात जास्त रन केले होते. त्याने 3 टेस्टमध्ये 47 च्या सरासरीनं 286 रन काढले. यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश होता. दक्षिण आफ्रिकेनं त्या सीरिजमध्ये भारतीय टीमचा 2-1 ने पराभव केला होता. विराटने दक्षिण आफ्रिकेत आजवर 5 टेस्टमध्ये 55 पेक्षा जास्त सरासरीनं 558 रन काढले आहेत.

Ashes: इंग्लंडचा फास्ट बॉलर बनला ऑफ स्पिनर, वाचा इंग्लिश टीमवर का आली ही वेळ!

विराटचा दक्षिण आफ्रिकेतील रेकॉर्ड चांगला आहे. मात्र, त्याचा सध्याचा रेकॉर्ड तितका खास नाही. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावून आता दोन वर्ष उलटली आहे. विराटने नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेश विरुद्ध शेवटचे शतक झळकावले होते. न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या सीरिजमध्ये विराट फक्त मुंबई टेस्टमध्ये खेळला. या टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये तो शून्यावर आऊट झाला होता. तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने 36 रन काढले.

First published:

Tags: Cricket news, Rahul dravid, Team india, Virat kohli